Shiv Jayanti 2024: जगभरात छत्रपती शिवरायांचा जयघोष; सातासमुद्रापार भगवा झेंडा, लंडनमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Shiv Jayanti Celebration In London: शिवजयंतीचा उत्साह फक्त महाराष्ट्रातच नाही, तर परदेशातही पाहायला मिळतोय. लंडनमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली आहे.
Shiv Jayanti 2024
Shiv Jayanti 2024Saam Tv

Shiv Jayanti Celebration Rally In London

शिवजयंतीमुळे (Shiv Jayanti) सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सर्वत्र शिवजयंती उत्सव जल्लोषात पार पडत आहे. भारताबाहेर देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीचा उत्साह पाहिला मिळाला आहे. लंडनमधे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाल्याचं पाहायला मिळतंय.  (Latest Marathi News)

लंडनमध्ये धिरजसिंह तौर यांनी स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशने दुसऱ्या वर्षात पदार्पण केलंय. त्यांनी दुसऱ्यांदा मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली (Shiv Jayanti In London) आहे. लंडनमधील डबल ट्री बाय हिल्टन मार्बल आर्च हॅाटेलमधील सभागृहात भारतीय व्यावसायिकांनी आणि विद्यार्थांनी एकत्र येऊन शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करुन अभिवादन केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सातासमुद्रापार 'हर हर महादेव'चा जयघोष

यावेळी लंडनमधील मार्बल आर्च परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रस्त्यावर रॅली देखील काढण्यात आली आहे. रस्त्यावर छत्रपतींच्या घोषणा दिल्या जात (Shiv Jayanti Celebration In London) होता. सातासमुद्रापार 'हर हर महादेव'चा जयघोष ऐकायला मिळाला आहे. शिवरायांची प्रतिमा घेऊन यावेळी रस्त्यावर रॅली काढण्यात आली आहे.

विशेष म्हणजे त्यांनी मागील वर्षी भारताबाहेर प्रथमच इंग्लंडमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी केली होती. याच असोसिएशनच्या वतीने आजचा भव्य कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला (Shiv Jayanti Rally In London) आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी तुषार मौले, स्वप्निल गावडे, सागर मुजुमले, सारंग तेजंकर व संज्योत भगवानकर यांनी सहकार्य केलं.

Shiv Jayanti 2024
Shiv Jayanti 2024: मशाल रैली, रायगड सायकल राईड, दिपोत्सव; शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला राज्यभरात उत्साह

लंडनमध्ये शिवजयंती साजरी

या कार्यक्रमाला शंभरहुन अधिक लोकांची उपस्थिती होती. यानिमित्ताने धिरजसिंह तौर यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या व व्यावसायिकांच्या हितासाठी सामाजिक चळवळ देखील सुरू केली आहे. ज्याद्वारे भारतातून इंग्लंडमध्ये शिक्षण अथवा नोकरीसाठी येणाऱ्या भारतीयांसाठी हक्काचं संघटन मिळणार आहे, असं असोसिएशनचे अध्यक्ष धिरजसिंह तौर यांनी सांगितलं (Shiv Jayanti Celebration) आहे.

सर्व भारतीयांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी आदराचं स्थान आहे. आता परदेशातही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला आहे. राज्यात सगळीकडे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी (Shiv Jayanti 2024) होतेय. सुरक्षिततेसाठी सगळीकडे पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे.

Shiv Jayanti 2024
Shiv Jayanti 2024: शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रभर राष्ट्रवादी साजरा करणार स्वराज्य सप्ताह, अनेक स्पर्धाचे करण्यात येणार आयोजन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com