शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यातच शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आणि गड किल्ल्यांविषयी आवड निर्माण व्हावी, या हेतूने ठाणे ते किल्ले रायगड अशी सायकल राईड काढण्यात आली आहे. सायकल प्रेमी फाउंडेशनने काढलेल्या या राईडमध्ये ठाणे, डोंबिवली, कल्याण, दिवा, मुंबई येथील 15 ते 67 वयापर्यंतचे सायकल प्रेमी सहभागी झाले आहेत. हे सायकलप्रेमी महाड इथं पोहोचले असून सकाळी रायगड किल्ल्यावर जावून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतील.
शिवजयंतीच्या पूर्व संध्येला नांदेडमध्ये महिलांकडून मशाल रैली काढण्यात आली. शहरातील गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मशाल रैली काढण्यात आली होती. हातात मशाल घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, महिलांकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दिवे लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान सोमवारी शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे. नवीन मोंढा येथून भव्य रैली काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बीडमध्ये शिवजयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. बीड शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विहंगम अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे शिवरायांचा अश्वारूढ असणारा पुतळा उजळून निघालाय. तर दुसरीकडे उद्या राजकीय विरोधक असणाऱ्या क्षीरसागर बंधूंकडून बीडकरांना शिवजयंती निमित्त कार्यक्रमाची अनोखी मेजवानी आयोजित करण्यात आलीय. (Latest Marathi News)
यामुळे आमदार संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर या दोघांकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे दोघांनीही कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून विद्युत रोषणाई देखील मोठ्या प्रमाणावर केल्याने आजपासूनच बीडमध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय.
बुलढाणा जिल्ह्यात दरवर्षीच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याच अनुषंगाने शिवजयंतीच्या पूर्व संध्येला बुलढाणा शहरातून शिवाज्योत घेऊन मोटारसायकल रॅली काढण्यात आली. चिखली रोड वरील सहकार विद्या मंदिर ते संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक पर्यंत ही रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये महिला आणि मुलींसह असंख्य शिवप्रेमी सहभागी झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.