Shiv Jayanti 2024: शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रभर राष्ट्रवादी साजरा करणार स्वराज्य सप्ताह, अनेक स्पर्धाचे करण्यात येणार आयोजन

Ajit Pawar On Shiv Jayanti 2024: शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतिने १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
Ajit Pawar On Shiv Jayanti 2024
Ajit Pawar On Shiv Jayanti 2024Saam Tv
Published On

Ajit Pawar On Shiv Jayanti 2024:

राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले, त्याच शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या. त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली. याच प्रेरणेतून स्वराज्य स्थापन करायचे या ध्येयाने शिवरायांनी मावळ्यांचे सैन्य उभे करून स्वराज्याची उभारणी केली, हा इतिहास आहे. याच इतिहासातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र प्रेरणा घेतो, असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या शिवजयंतीच्या निम्मीताने आयोजित ‘स्वराज्य सप्ताहा’ कार्यक्रमाच्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतिने १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल ,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, मंत्री धर्मरावबाबा अत्राम, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ उपस्थित होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ajit Pawar On Shiv Jayanti 2024
Nursing Colleges: सांगली, जळगांव, बारामतीसह राज्यात 6 ठिकाणी सुरू होणार नर्सिंग महाविद्यालय, राज्य सरकारचा मोठा निर्णय

खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांसाठी लिफ्टची सोय करा: उपमुख्यमंत्री अजित पवार

दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याची योग्य सोय होण्यासाठी अत्याधुनिक लिफ्टची सोय करावी. त्यासाठी लागणारी शासकीय जमीन जिल्हा परिषदेला विनामोबदला उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात खंडोबा मंदिर येथे लिफ्ट बसविणे आणि इतर सोयीसुविधांबाबत बैठक झाली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत.

Ajit Pawar On Shiv Jayanti 2024
ED on Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सहावे समन्स, न्यायालयानेही नोटीस बजावली; हजर न झाल्यास काय होईल कारवाई?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, निमगाव येथील खंडोबा मंदिर उंचावर असल्याने याठिकाणी भाविकांना विनासायास जाता येण्याच्या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी रोपवेची मागणी केली होती. त्याठिकाणी रोपवेची योग्य उभारणी करता येत नसल्याने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लिफ्ट उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. लिफ्टसह इतर सुविधांसाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय राखीव निधीमधून पैसे देण्यास मंजुरी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com