Shiv Jayanti: राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, शिवनेरी गडावर शिवभक्तांची गर्दी; पोलिसांचा तडगा बंदोबस्त

Shiv Jayanti On Shivneri: राज्यभर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. सर्व ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रम पार पडणार आहे.
Shiv Jayanti
Shiv Jayanti Saam Tv
Published On

रोहिदास गाडगे

Shiv Jayanti Celebration CM Eknath Shinde On Shivneri

राज्यभर शिवजयंती (Shiv Jayanti) मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्ताने राज्यभर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. किल्ले शिवनेरीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde),उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), सहकारमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता शासकीय कार्यक्रम पार पडणार आहे. (Latest Marathi News)

त्यानंतर मराठा सेवा महासंघाची सभा पार पडेल. त्या ठिकाणावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. शिवजयंतीनिमित्ताने (Shiv Jayanti Celebration) आज किल्ले शिवनेरीवर आदिवासी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, आदीवासी नृत्य, दावत देण्यात येणार आहे. त्यानंतर शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा पार पडेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवजन्मोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

यंदाच्या वर्षी शिवजन्मोत्सवानिमित्ताने सलग पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे शिवनेरी परिसरात उत्साहाचे वातावरण पहायला (Shiv Jayanti On Shivneri) मिळतंय. ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

शिव जयंत्ती उत्सवाला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शासकीय कार्यक्रम पार (CM Eknath Shinde On Shivneri) पाडल्यानंतर शिवभक्तांना थेट गडावर सोडण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

Shiv Jayanti
Shiv Jayanti 2024: शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रभर राष्ट्रवादी साजरा करणार स्वराज्य सप्ताह, अनेक स्पर्धाचे करण्यात येणार आयोजन

'असा' असेल पोलीस बंदोबस्त

शिवजयंती उत्सव सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या नियोजनाखाली शहरात 2 हजार 245 पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात (Shiv Jayanti 2024 Police Security) आलाय. याशिवाय शहरातील वाहतुकीतही मोठा बदल केला आहे. मुख्य क्रांती चौकातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

4 पोलीस उपयुक्त, 8 सहाय्यक, आयुक्त 29 पोलीस निरीक्षक, 71 सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 104 महिला पोलीस, 1578 पुरुष पोलीस, 350 होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी शिवाय शहरात ८२ ठिकाणी फिक्स पॉईंट लावले (Sambhaji Nagar) आहेत. प्रत्येक ठिकाणी तीन पोलीस नेमले आहेत. त्यात एक शस्त्र धारी आहे.S

Shiv Jayanti
Shiv Jayanti 2024: मशाल रैली, रायगड सायकल राईड, दिपोत्सव; शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला राज्यभरात उत्साह

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com