एकनाथ शिंदेंच्या आमदाराची 40 लाखांची डिल, कथित व्हिडिओ व्हायरल; राजकारणात मोठा भूकंप

Alleged 40 Lakh Bribery Video Of Rajesh Kshirsagar Explained: शिंदे गटातील आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर 40 लाखांच्या कथित लाचेचा आरोप; व्हायरल व्हिडिओमुळे राजकारणात खळबळ, SIT चौकशीची मागणी
Alleged viral video controversy involving MLA Rajesh Kshirsagar triggers major political reactions in Maharashtra
Alleged viral video controversy involving MLA Rajesh Kshirsagar triggers major political reactions in Maharashtrasaam tv
Published On

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही

शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे गंभीर आरोप केले. एका व्यावसायिकाकडून तब्बल 40 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भातील पैशांच्या कथित देवाण-घेवाणीच्या संभाषणाचा व्हिडिओ पत्रकार परिषदेत प्रसारित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही इंगवले यांनी केली. दरम्यान, या आरोपांवर आमदार राजेश क्षीरसागर यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप करत, एका व्यावसायिकाकडून 40 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा केला.

या व्यवहारासंदर्भातील कथित संभाषणाचा व्हिडिओ त्यांनी पत्रकारांसमोर सादर केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, या आरोपांबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. तर या व्हिडिओची साम टीव्ही पुष्टी करत नाही.

Alleged viral video controversy involving MLA Rajesh Kshirsagar triggers major political reactions in Maharashtra
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत एकाच विमानाने नागपूरला रवाना; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

ऋतुराज क्षीरसागर यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यामध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा हात आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी हाच व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. मुळात रविकिरण इंगवले हा ब्लॅकमेलर आहे. असं पत्रक आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्ध केले आहे.

Alleged viral video controversy involving MLA Rajesh Kshirsagar triggers major political reactions in Maharashtra
Maharashtra Politics: विमानापेक्षा इमान महत्वाचा...; ठाकरे-फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासावरून शिंदे संतापले

ठाकरे गटाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार राजेश क्षीरसागर प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. कथित व्हिडिओ क्लिपची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करून राजेश क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करून राजेश क्षीरसागर यांना अटक करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये उल्लेख झालेल्या राहुल आणि प्रशांत या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणीही संजय पवार आणि विजय देवणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com