Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra Monsoon Session: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या विकासकामांचा उल्लेख केला. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांना बहिष्कार टाकण्याचे राजकारण थांबवून विधायक चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra Monsoon Session
EKNATH SHINDE URGES OPPOSITION TO END BOYCOTT AND PARTICIPATE IN ASSEMBLY DISCUSSIONSsaam tv
Published On
Summary
  • एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना बहिष्काराचे राजकारण सोडण्याचे आवाहन केले.

  • सरकारने शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक निर्णय घेतल्याचा दावा

  • पावसाळी अधिवेशनात विधायक चर्चेद्वारे जनहिताचे प्रश्न सोडवण्याची तयारी

शेतकरी, महिला, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विक्रमी निर्णय घेतले आहेत. कर्जमाफी, शेतकरी मदत, लाडकी बहीण योजना, उद्योग गुंतवणूक, मेट्रो, विमानतळ, महामार्ग, बंदरे आणि गृहनिर्माण यांसारख्या विविध क्षेत्रांत राज्याने मोठी झेप घेतली आहे. विरोधकांनी बहिष्काराचे राजकारण सोडून सभागृहात येऊन विधायक चर्चा करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Maharashtra Monsoon Session
'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. विरोधकांच्या बहिष्काराच्या भूमिकेवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, अधिवेशन हे राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांना न्याय देण्यासाठी असते.

मात्र विरोधी पक्षाने कायम बहिष्काराचे हत्यार वापरले आहे. "इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष सुरू असतानाही सीजफायर झाले, पण विरोधकांचा बहिष्कार काही संपत नाही," असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांना दिवसाचा चहा आवडत नाही त्यांना रात्रीचा लपवून चहा आवडतो, असाही टोला त्यांनी लगावला.

Maharashtra Monsoon Session
Operation Tiger: ठाकरे गट की शिंदे गट? बंडखोरीच्या चर्चेदरम्यान ओमराजेंनी बोलून दाखवली मनातील खदखद

सरकार प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार असून विरोधकांनी सभागृहात येऊन चर्चा करावी, असे ते म्हणाले. पावसाचे नियोजन, शेतकऱ्यांचे प्रश्न, विकासकामे आणि जनहिताचे विषय यावर सविस्तर चर्चा व्हावी, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी, पाऊस आणि विविध विषयांबाबतची सविस्तर आकडेवारी मांडली असून सरकारची भूमिका पारदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, राज्याच्या इतिहासात कधीही झाली नाही इतकी मदत महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिली आहे. ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, २०२२ मध्ये १५ हजार कोटी रुपयांची मदत, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे काम महायुती सरकारने केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com