Vilas Ghule Case : खासदार बजरंग सोनावणे यांना मोठा झटका! विलास घुले हत्या प्रकरणात मुलाची होणार चौकशी

Beed Vilas Ghule Case Update News : बीडच्या केज येथील विलास घुले हत्या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले असून एसआयटीकडून खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांची चौकशी केली जाणार आहे.
VILAS GHULE MURDER CASE: SIT TO QUESTION SAURAV SONAWANE IN MAJOR BEED INVESTIGATION TWIST
VILAS GHULE MURDER CASE: SIT TO QUESTION SAURAV SONAWANE IN MAJOR BEED INVESTIGATION TWISTSaam Tv
Published On
Summary
  • विलास घुले हत्या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण

  • एसआयटीकडून सौरव सोनवणे यांची चौकशी होणार

  • सौरव सोनवणे स्वतःहून केज पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याची माहिती

बीडच्या केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT ) खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सौरव सोनवणे आज दुपारी स्वतः केज पोलीस ठाण्यात हजर राहून एसआयटीच्या प्रश्नांना सामोरे जाणार असल्याचे समजते. दरम्यान आता या प्रकरणात कोणाचा पाय खोलवर रुतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल मालक विलास घुले हा २० जूनच्या रात्री दोन गटात सुरू असलेलं भांडणं सोडवण्यासाठी गेला होता. यानंतर आरोपी आणि विलास घुलेमध्ये जोरदार बाचाबाची झाली. विलासच्या हॉटेलबाहेरच ८ ते ९ जणांकडून त्याची हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असून यामागे सूत्रधार कोण आहे याचा तपस पोलीस करत आहेत. दरम्यान या प्रकरणात राजकारणातील नेते बजरंग सोनावणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याच नाव समोर आलं असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

VILAS GHULE MURDER CASE: SIT TO QUESTION SAURAV SONAWANE IN MAJOR BEED INVESTIGATION TWIST
Bribe Case : धक्कादायक! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी घेतली लाच

सौरव सोनवणेची SIT चौकशी

दरम्यान, याआधी एसआयटीच्या तपासाचा भाग म्हणून फॉरेन्सिक पथकाने केज येथील पवनसुत निवासस्थानी भेट दिली होती. या भेटीदरम्यान संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तपास यंत्रणा उपलब्ध तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे प्रकरणातील प्रत्येक बाब पडताळून पाहत आहे.

VILAS GHULE MURDER CASE: SIT TO QUESTION SAURAV SONAWANE IN MAJOR BEED INVESTIGATION TWIST
Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

सौरव सोनवणे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर राहणार

विशेष म्हणजे, यापूर्वी खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचे पुत्र सौरव सोनवणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली होती. पोलिसांनी किंवा तपास पथकाने जेव्हा चौकशीसाठी बोलावले, तेव्हा हजर राहून सहकार्य करू, असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसारच सौरव सोनवणे आज स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. आता सौरव सोनवणे यांच्या चौकशीनंतर एसआयटी कोणती भूमिका घेते आणि तपासातून कोणती नवी माहिती समोर येते, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com