Sharad Pawar Setback : भाजपचा शरद पवारांना जोरदार धक्का, आमदारकीचा उमेदवार साथ सोडणार

NCP leader Ganesh Gite joins BJP : नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांचे निकटवर्तीय गणेश गीते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत काही माजी नगरसेवकही भाजपवासी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Sharad Pawar's party faces another setback as key leader exits
Ganesh Gite, former NCP leader from Nashik, is expected to join BJP along with key supporters ahead of local elections.Saam TV News Marathi
Published On

अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Sharad Pawar's NCP Faces Major setback : राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी सत्ताधारी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेते भाजपात प्रवेश करत असल्याचा धडाका सुरू झाला आहे. धुळ्याचे कुणाल पाटील लवकरच भाजपात प्रवेश कऱणार आहेत. नाशिकमधून सुधाकर बडगुजर यांनी थाटामाटात भाजपात प्रवेश केला. माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या पक्ष प्रवेशावरही शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचाही समावेश झाला आहे. राष्ट्रवादीचे गणेश गिते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन जुलै रोजी अपूर्व हिरे यांच्यासोबतच त्यांचा भाजपात प्रवेश होऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. (Ganesh Gite set to leave NCP and rejoin BJP before Nashik civic polls)

मागील काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमधून भाजप प्रवेशाचा धडका सुरू आहे. ठाकरेंचे अनेक शिलेदार भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. आता नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार आहे. कारण, शरद पवार गटाचे नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपच्या वाट्यावर असल्याचे समजतेय. गणेश गिते यांची नाशिकमध्ये मोठी ताकद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी त्यांनी साथ सोडल्यास शरद पवार यांना मोठा धक्का बसू शकतो. (BJP strengthens its hold in North Maharashtra with new political entries)

Sharad Pawar's party faces another setback as key leader exits
Setback for Congress : उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, राहुल गांधींचा हुकमी एक्का भाजपात जाणार

गणेश गिते यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपला रामराम ठोकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी नाशिक पूर्वमधून निवडणूकही लढवली होती, पण पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा गणेश गीते भाजपवासी होणार आहेत. गीते यांच्या सोबत काही माजी नगरसेवकांचा देखील भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

Sharad Pawar's party faces another setback as key leader exits
Nashik BJP : नाशिकचं राजकारण फिरलं, बडगुजर यांच्यानंतर आणखी एक दिग्गज भाजपात

गणेश गिते यांना मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून नाशिकमध्ये ओळखले जाते. गणेश गिते यांनी विधानसभेला तिकिट न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात गणेश गीते यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. आता ते पुन्हा भाजपमध्ये परत येत असल्याचे समजतेय. येत्या दोन दिवसात गणेश गीते आणि समर्थकांचा भाजपत प्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Sharad Pawar's party faces another setback as key leader exits
School Bus : बुधवारपासून राज्यभरात स्कूल बस बंद, बस मालकांनी पुकारले आंदोलन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com