School Bus : बुधवारपासून राज्यभरात स्कूल बस बंद, बस मालकांनी पुकारले आंदोलन

Maharashtra School Bus strike, School Bus Owners Protest : महाराष्ट्रातील शाळा बस मालकांनी २ जुलैपासून अनिश्चित काळासाठी संपाची घोषणा केली आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे हा निर्णय घेतला असून, वाहतूक नियम, दंड आणि परवानग्यांवरील अन्यायामुळे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Maharashtra school bus strike from July 2 over transport policy issues
School bus owners in Maharashtra to launch indefinite strike from July 2 over transport-related challenges and penalties. Saam TV News
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Maharashtra school bus owners protest : राज्यातील शाळा बस मालकांनी बुधवारपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय वाहतुकीसंदर्भातील अनेक समस्यांकडे शासनाचे व वाहतूक खात्याचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शाळा बस ऑनर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. शासनाने जर आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर २ जुलैपासून आम्ही संपूर्ण राज्यभर शाळा बस सेवा बंद ठेवू. आमच्या संघटनेची भूमिका सेवा थांबवण्याची नसली, तरी शाळा बस व्यवसायात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे शाळा बस ऑनर्स असोसिएशनने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मागील अनेक वर्षांपासून शालेय वाहतूक क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामध्ये वाहतूक पोलिसांकडून बसचालकांवर होणारी अकारण कारवाई, सीसीटीव्ही, वेबरेडर व जीपीएस यासारख्या सुविधांसाठी ई-चालानद्वारे होणारी दंडात्मक कारवाई, तसेच आवश्यक परवानग्यांची न मिळणारी अडचण या प्रमुख बाबी आहेत, अशी माहिती अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.

Maharashtra school bus strike from July 2 over transport policy issues
Setback for Congress : उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, राहुल गांधींचा हुकमी एक्का भाजपात जाणार

असोसिएशनच्या प्रमुख मागण्या कोणत्या ?

शालेय वाहतूक सेवेसंदर्भातील सर्व शिफारसी शाळा बस सेवेवर लागू केल्याची स्पष्टता देणारे ई-चालान त्वरित रद्द करावेत. सर्व मान्यताप्राप्त शाळा बस चालकांना ओळखपत्र देण्यात यावे. शाळा बस वाहनांवरील नियमांचे पालन करणाऱ्या वाहनांवर कोणताही अन्यायकारक दंड लादू नये. शासन, शाळा प्रशासन व शाळा बस संघटनांसह संयुक्त टास्क फोर्स स्थापन करावी. अनिल गर्ग म्हणाले, “शासनाने जर आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर २ जुलैपासून आम्ही संपूर्ण राज्यभर शाळा बस सेवा बंद ठेवू. आमच्या संघटनेची भूमिका सेवा थांबवण्याची नसली, तरी शाळा बस व्यवसायात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे.” शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व शालेय वाहतुकीतील अडचणी सोडवण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Maharashtra school bus strike from July 2 over transport policy issues
Nashik BJP : नाशिकचं राजकारण फिरलं, बडगुजर यांच्यानंतर आणखी एक दिग्गज भाजपात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com