अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी
Apoorva Hire joins BJP : उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमधून भाजपमध्ये प्रवेशाचा धडका सुरू झाला आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ माजी आमदार अपूर्व हिरे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बुधवारी २ जुलैला माजी आमदार अपूर्व हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण देणारी मोठी घडामोड आहे. अपूर्व हिरे हे नाशिक शिक्षक मतदार संघाचे आमदार होते. २०१९ मध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सुधाकर बडगुजर यांना पक्ष प्रवेशाला विरोध करणाऱ्या सीमा हिरे यांनी मात्र अपूर्व हिरे यांच्या भाजप प्रवेशाचं स्वागत केलं आहे.
माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बुधवारी दुपारी १२ वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश होणार आहे. डॉ. हिरे यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थकही भाजपमध्ये सामील होणार आहेत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी नाशिकमधील भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. गिरीश महाजन यांच्या रणनीतीमुळे हा प्रवेश शक्य झाल्याचे सांगितले जाते. याशिवाय, ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनीही अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.