Maharashtra Weather : कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार, पुढील ५ दिवस मराठवाड्यात धो धो, वाचा हवामानाचा अंदाज

Orange alert issued in Konkan and Western Maharashtra : कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु असून मराठवाड्यात ५ दिवस धो धो पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त असून पावसाची प्रतीक्षा संपली आहे.
Maharashtra Weather forecast
Mumbai and Pune brace for torrential rain as IMD issues a 5-day heavy rainfall alert across 13 districts in Maharashtra. Saam TV News
Published On

IMD weather forecast for Maharashtra : पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील पाच दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यता आली आहे. दरम्यान, पावसाने उघडीप घेतल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांने पेरण्या उरकल्या असून पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. आता राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भ आणि रायगड आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Weather forecast
Pandharpur Wari : माऊलींच्या पालखी सोहळ्यावर दु:खाचा डोंगर, दोन वारकऱ्यांचा मृत्यू

मराठवड्यात पुढील ५ दिवस धो धो

मराठवाड्यात 1 ते 5 जुलै रोजी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग ताशी 30 किमी राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज सकाळपासून मराठवाड्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता दिसत आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी यंदा मे महिन्यात मोठ्याप्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. या अवकाळी पावसाच्या भरवशावरच जवळपास शेतकऱ्यांनी 50 टक्के पेरण्या उरकल्या होत्या.

दरम्यान, पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या धोक्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाद्वारे पिकाला पाणी देण्यास सुरुवात केली होती. दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला होता. दरम्यान, आता 1 जुलैपासून 5 दिवस मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात 3 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी,, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरी एवढे 4 ते 10 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather forecast
८ कोटी EPFO खातेधारकांसाठी खुशखबर, ८.२५ % व्याज जमा, तुमचा बॅलन्स कसा चेक कराल?

बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त

कोकणात सध्या समाधानकारक पाऊस पडतोय त्यामुळं बळीराजा सध्या भात लावणीच्या कामात गुंतून गेलाय.शेतीत यांत्रिकीकरण झालं असंल तरी कोकणात अनेक ठिकाणी नांगरणीसाठी आजही बैलजोडीचा वापर केला जातोय.भलरी गात बळीराजा भात लावणी करतोय.भलरी हे पारंपारीक शेतक-याचं गाण आहे यातून एक वेगळा आनंद शोधण्याचा प्रयत्न बळीराजा करत असतो.काम करायला या गाण्यांमधून एक वेगळीच स्फुर्ती यांना मिळत असते.

Maharashtra Weather forecast
Solapur : सहाय्यक पोलीस आयुक्ताने भाजप पदाधिकाऱ्याला मारली लाथ, सोलापूरचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com