Pandharpur Wari : माऊलींच्या पालखी सोहळ्यावर दु:खाचा डोंगर, दोन वारकऱ्यांचा मृत्यू

Pandharpur Wari, Ashadhi Ekadashi : संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात दुःखद घटना घडली. फलटणजवळ टेंट उभारताना विजेचा शॉक लागून नागपूरच्या दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला. साताऱ्यात एका ज्येष्ठ वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. वारीवर शोककळा पसरली आहे.
Pandharpur Wari, Ashadhi Ekadashi
Heartbreaking scene from Wari: Two Warkaris electrocuted near Phaltan, another dies of heart attack during Mauli’s Palakhi procession to Pandharpur.
Published On

Sant Dnyaneshwar Palakhi : आषाढी एकादशीला पंढरपूर वारीची महाराष्ट्रात वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. दरवर्षी राज्यभरातून लाखो वारकरी वारीत सहभागी होतात अन् लाडक्या विठुरायाची भेट घेण्यासाठी पंढरीकडे पायी जातात. नागपूरमधील दोन वारकऱ्यांची मात्र विठुरायाची भेट झालीच नाही. त्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. माऊलींच्या पालखीत विठुनामाच्या गजरात पंढरपूरकडे निघालेल्या नागपूरच्या दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर माऊलांच्या पालखी सोहळ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मधुकर शेंडे आणि तुषार रामेश्वर बावनकुळे असं मृत झालेल्या वारकऱ्यांची नावं आहेत.

नागपूरमधील राजाबाक्षा येथील मधुकर शेंडे आणि तुषार रामेश्वर बावनकुळे हे वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत सहभागी झाले होते. पण पंढरीत पोहचण्याआधीच विजेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. माऊलींची पालखी फलटणजवळ विसाव्यासाठी थांबली होती, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

Pandharpur Wari, Ashadhi Ekadashi
माजी खासदाराच्या PA ची भररस्त्यात हत्या, तलवारीने तुकडे पाडले, व्हिडिओ व्हायरल

फलटणजवळ माऊलींची पालखी विसाव्यासाठी थांबली होती. त्यावेळी टेंट उभारताना तुषार बावनकुळे यांचा हात लोखंडी रॉडला लागला. तुषार यांना लोखंडी रॉडला जोरात करंट लागला, त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या मधुकर यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. नागपूरमधील दोन्ही कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. पालखीतही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तुषार आणि मधुकर विठुमाऊलीला भेटण्यासाठी भक्तीत तल्लीन होत निघाले होते, पण त्याआधीच नियतीने घात केला अन् त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Pandharpur Wari, Ashadhi Ekadashi
Solapur : सहाय्यक पोलीस आयुक्ताने भाजप पदाधिकाऱ्याला मारली लाथ, सोलापूरचा व्हिडिओ व्हायरल

वारीत वारकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ घेऊन निघालेल्या वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे. विठु-रुक्मिनीचा जयघोष करत अनेकजण पायी पंढरपूरकडे निघाले आहेत. मात्र, साताऱ्यातील फलटण येथे एका वारकऱ्याच्या मृत्यूने शोककळा पसरली. इंदापूर तालुक्यातील न्हावी येथील ७५ वर्षीय नामदेव किसन मारकड हे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत देहूपासून पायी चालत फलटणला पोहोचले. निंबाळकर वस्तीत विसाव्यासाठी थांबले असता, त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Pandharpur Wari, Ashadhi Ekadashi
८ कोटी EPFO खातेधारकांसाठी खुशखबर, ८.२५ % व्याज जमा, तुमचा बॅलन्स कसा चेक कराल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com