
सातारा : राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीतील विठुरायाच्या भेटीची ओढ लागली आहे. विठु-रुक्मिनीचा जयघोष करत वारकऱ्यांची पाऊले पंढपुराकडे वळाली आहेत. माऊल नाम जपत वारकऱ्यांची पाऊले पंढरपूरच्या दिशेने पडत आहेत. याच विठुरायाच्या दर्शनाची ओढ बाळगून असलेला एका वारकरी विसाव्यासाठी थांबला. मात्र, अचानक या वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. या वारकऱ्याच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
साताऱ्यातील फलटण येथे विसाव्यासाठी थांबलेल्या वाकरऱ्याच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नामदेव किसन मारकड असे ७५ वर्षीय वारकऱ्याचे नाव आहे. ७५ वर्षीय नामदेव हे इंदापूर तालुक्यातील न्हावी येथील राहणारे होते. नामदेव हे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत देहूपासून पायी फलटणपर्यंत चालत निघाले होते. त्यानंतर फलटण येथील निंबाळकर वस्तीत विसाव्याला थांबले. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.
वारकऱ्याच्या मृतदेह शासनाने रुग्णालयातून मूळगावाकडे रवाना करण्यात आला आहे. वारकरी नामदेव यांच्या मृत्यूने मारकड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर त्यांच्या मृत्यूने इंदापूर तालुक्यातील न्हावी परिसरातही शोककळा पसरली आहे.
अकोल्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत हभप नारायण महाराज तराळे यांचं निधन झालं. तराळे यांनी ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तराळे यांनी बाळापूर तालुक्यातील व्याळा शेवटचा श्वास घेतला. त्यांनी अवघ्या वयाच्या नवव्या वर्षापासून वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर घेतली होती. तराळे यांनी सलग ६० वर्षे सलग पंढरीची वारी केली आहे. तराळे यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.