Maharashtra Police Transfers : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खांदेपालट; ५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

Maharashtra Police Transfers update : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खांदेपालट झालीये. राज्यातील ५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Maharashtra Police News
Maharashtra Police Saam tv
Published On

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीआधीच पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील ५० हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहत. गृह विभागाने पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यीतल विविध जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा नावाचा समावेश आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खांदेपालट झाली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील ५० हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, कोल्हापूरमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Police News
BJP : भाजपच्या महिला नेत्याची पक्षातून हकालपट्टी; आमदारावर केले होते गंभीर आरोप

लातूर जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गृह विभागाने आदेश जारी केले आहेत.

Attachment
PDF
202506271851257929
Preview

पुण्याच्या शस्त्र निरीक्षण शाखेच्या तेजस्विनी बाळासाहेब सातपुते यांची पुण्याच्या रा. रा. पोलीस बल गट क्र. 1 मध्ये समादेशकपदी बदली झाली आहे. अश्विनी सानप यांची पुण्याच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.

संजय वाय जाधव यांची नवी मुंबईतील रा. रा. पोलीस बल गट क्र.11 मध्ये समादेशकपदी झाली आहे. शीतल झगडे यांची मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निलेश मोरे यांची भंडाऱ्याच्या अप्पर पोलीस अक्षीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra Police News
Pune Crime : नवऱ्याकडून ५ कोटी पोटगी मिळाली, दुसरं लग्न करायला निघाली; पण साडेतीन कोटी गमावले, नेमकं काय घडलं?

वैभव कुलबुर्गै यांची अहिल्यानगरची अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर गोकुळ राज जी यांची गडचिरोलीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com