25-year-old Hindu woman raped in Cumilla Bangladesh : बांगलादेशमध्ये २५ वर्षीय हिंदू महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. कुमिल्ला जिल्ह्यातील मुरादनगर परिसरात हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले. नराधमाने या घटनेचे व्हिडिओ शूट करत सोशल मीडियावर व्हायरल केले. बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली. मुलीने हिम्मत दाखवत समोर येऊन याप्रसंगी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर आपत्तीजनक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बांगलादेशमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी फज्र अलीसह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे.
कुमिल्ला जिल्हा पोलिस अधीक्षक नजीर अहमद खान यांनी रविवारी या घटनेबाबतची माहिती दिली. पीडितेच्या जबाबानुसार, ती गेल्या १५ दिवसांपासून आपल्या मुलांसह वडिलांच्या घरी राहत होती. तिचा पती दुबईत असतो. गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फज्र अली घरी आला होता. महिलेने तिच्या घराचा दरवाजा उघडला नाही. संतापलेला फज्र जबरदस्तीने घरात गेला अन् अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे, स्थानिकांच्या माहितीनुसार त्या दिवशी परिसरात रथयात्रेची तयारी सुरू होती. एका शेजाऱ्याला घरातून किंकाळ्या आणि ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तो घराजवळ पोहचला तर दरवाजा तुटलेला दिसला. त्याने इतरांना बोलवलं अन् घरात गेला. फज्रला रंगेहाथ पकडले गेले, परंतु स्थानिकांनी मारहाण केल्यानंतर तो पळून गेला. स्थानिकांनी पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
या घटनेदरम्यान काहींनी पीडितेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. फज्र अली याला रविवारी पहाटे ढाका येथील सईदाबाद परिसरातून ताब्यात घेतले. सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती नजीर अहमद खान यांनी दिली. अल्पसंख्याक समुदायावर बांगलादेशमध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वीही बांगलादेशात हिंदू महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या घटनांनी असंतोष वाढवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.