Setback for Congress : उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, राहुल गांधींचा हुकमी एक्का भाजपात जाणार

Kunal Patil Congress leader joins BJP : धुळेचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का बसला असून काँग्रेसचा तीन पिढ्यांचा विश्वासू घराणं भाजपच्या वाटेवर निघालं आहे.
Rahul Gandhi's close aide switches party ahead of elections
Former Congress MLA Kunal Patil, grandson of Chudamani Patil and son of veteran Rohidas Patil, to join BJP — shaking up North Maharashtra politics ahead of civic polls.Saam TV News Marathi
Published On

अभिजित सोनवणे

Rahul Gandhi's close aide switches party ahead of elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचा युवा चेहरा असलेले माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये जाणार आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाची तारीखही निश्चित झाली आहे. त्याशिवाय नाशिकमधून माजी आमदार अपूर्व हिरे देखील करणार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे.

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का

निवडणुकीला चार महिने शिल्लक असतानाच उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार कुणाल पाटील काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांची ओळख राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अशी आहे. मंगळवारी १ जुलै रोजी माजी आमदार कुणाल पाटील यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. कुणाल पाटील भाजपमध्ये गेले आहेत, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Rahul Gandhi's close aide switches party ahead of elections
८ कोटी EPFO खातेधारकांसाठी खुशखबर, ८.२५ % व्याज जमा, तुमचा बॅलन्स कसा चेक कराल?

पाटील कुटुंबामुळे धुळ्यात भाजपची ताकद वाढली

कुणाल पाटील यांचं कुटुंब तीन पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले आहे. कुणाल पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. रोहिदास पाटील यांचे चिरंजीव आहेत. रोहिदास पाटील काँग्रेसकडून ८ टर्म आमदार आणि मंत्री देखील राहिलेले आहेत. कुणाल पाटील यांचे आजोबा चुडामणी पाटील देखील ३ वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले आहेत. मागील तीन पिढ्यांपासून पाटील कुटुंब कट्टर काँग्रेसी राहिलेले आहे. मात्र आता काँग्रेसला रामराम ठोकत माजी आमदार कुणाल पाटील भाजपवासी होणार आहेत. कुणाल पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे धुळ्यात भाजपची ताकद वाढली आहे.

Rahul Gandhi's close aide switches party ahead of elections
Pandharpur Wari : माऊलींच्या पालखी सोहळ्यावर दु:खाचा डोंगर, दोन वारकऱ्यांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com