BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Dr Gopalrao Patil Passes Away: भाजपचे दिग्गज नेते आणि माजी खासदार गोपाळराव पाटील यांचे निधन झाले. लातूर येथील निवासस्थांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा
Dr Gopalrao Patil Passes AwaySaam Tv
Published On

Summary -

  • गोपाळराव पाटील यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन

  • ‘लातूर पॅटर्न’चे जनक म्हणून ओळखले जात होते

  • शिक्षण आणि राजकारण क्षेत्रात मोठे योगदान होते

  • त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा

संदीप भोसले, लातूर

लातूर पॅटर्नचे निर्माते आणि भाजपचे माजी खासदार डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचे निधन झाले. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लातूरमधील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. शिक्षण क्षेत्राला लातूर पॅटर्नची ओळख करून देणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे फक्त लातूरच नाही तर संपूर्ण राज्याची राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

गोपाळराव पाटील यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहे. सायंकाळी ५ वाजता नवीन एमआयडीसी परिसरातील शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या क्रीडा मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनामुळे भाजपला धक्का बसला. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 'लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला', अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा
Political News: अमित शहांच्या रोड शोदरम्यान राडा, TMC अन् BJP कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली

३ ऑक्टोबर १९३१ रोजी जन्मलेले डॉ. गोपाळराव पाटील हे बालरोगतज्ज्ञ होते. मात्र त्यांची खरी ओळख ही एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून होती. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लातूरमध्ये आधुनिक शिक्षणाचे जाळे विणले. त्यातूनच पुढे शिक्षणाचा लातूर पॅटर्न उदयाला आला. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना अधिकारी आणि डॉक्टर-इंजिनिअर बनवण्याचं स्वप्न त्यांनी सत्यात उरवलं. लातूर जिल्ह्यात भाजपाचा पाया मजबूत करणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख होती.

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा
BJP CM: भारतात भाजपचे किती मुख्यमंत्री? एका क्लिकवर वाचा यादी

राजकारणामध्ये देखील डॉ. गोपाळराव पाटील यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. मराठवाड्यात जेव्हा भाजपचा पाया रचला जात होता तेव्हा डॉ. गोपाळराव पाटील यांनी खंबीरपणे नेतृत्व केलं. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. १९९१ ते १९९९ दरम्यान त्यांनी चार वेळा लोकसभा निवडणूक लढवली होती. १९९८ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. डॉ. गोपाळराव पाटील यांच्या कार्याची दखल घेत भाजपने त्यांना राज्यसभेवरही संधी दिली होती.

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा
BJP Leader Killing Case : भाजप नेत्याची हत्या; काँग्रेस आमदाराला जन्मठेपेची शिक्षा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com