Political News: अमित शहांच्या रोड शोदरम्यान राडा, TMC अन् BJP कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली

Amit Shah Roadshow: अमित शहा यांचा पश्चिम बंगालमध्ये रोड शो झाला. या रोड शोदरम्यान भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली.
Political News: अमित शहांच्या रोड शोदरम्यान राडा, टीएमसी अन् भाजप कार्यकर्ते आमने-सामने; एकमेकांची डोकी फोडली
Amit ShahSaam Tv
Published On

Summary -

  • अमित शहांच्या रोड शोदरम्यान दुर्गापूरमध्ये हिंसाचार

  • भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

  • या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत

  • पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी राजकीय तणाव वाढला

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुर्गापूरमध्ये अमित शहा यांचा रोडशो झाला. या रोडशोदरम्यान राडा झाला. बांकुडा मोड परिसरात तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. या घटनेत दोन जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दुर्गापूर महकमा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाजपने आरोप केला की, त्यांचा कार्यकर्ता रवी दासला अमित शाह यांच्या रोड शोमध्ये सहभागी राहिल्यामुळे मारहाण केली. त्याचे डोके फोडण्यात आले. लक्ष्मण घोडुईने या घटनेवरून टीएमसीवर दहशत पसरवल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, टीएमसीच्या नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि भाजप विनाकारण तणाव निर्माण करत असल्याचा दावा केला. कवी दत्ता यांनी सांगितले की, 'अशांतीची आग लावणे सोपे आहे. पण ती विझवणे कठीण आहे.' या घटनेनंतर परिसरातील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.

Political News: अमित शहांच्या रोड शोदरम्यान राडा, टीएमसी अन् भाजप कार्यकर्ते आमने-सामने; एकमेकांची डोकी फोडली
BJP: महिलांना दरमहा ₹२५०० अन् गरीब कुटुंबाला २ सिलिंडर फ्री देणार, भाजपकडून मोठी घोषणा

भाजपचे नेते अभिजित दत्ता यांनी आरोप केला की, अमित शाह यांच्या रोडशोमधील प्रचंड गर्दी पाहून टीएमसी पक्ष हादरला आहे. भाजप नेत्याने असाही आरोप केला की, आठ ते दहा टीएमसी कार्यकर्त्यांवर काठ्यांनी हल्ला करण्यात आला. घरी परत जात असताना आमच्या एका कार्यकर्त्यावर काठ्यांनी हल्ला करण्यात आला. त्याच्या घराची तोडफोड करण्यात आली आणि त्याच्या आईला धक्काबुक्की करण्यात आली.

Political News: अमित शहांच्या रोड शोदरम्यान राडा, टीएमसी अन् भाजप कार्यकर्ते आमने-सामने; एकमेकांची डोकी फोडली
BJP Office: भाजप मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं परिसर हादरला; चंदीगडमध्ये खळबळ

अभिजीत दत्ता यांनी इशारा दिला की, जर २४ तासांच्या आत आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्यांना अटक झाली नाही, तर दुर्गापूरमध्ये मोठे आंदोलन करू. पश्चिम बंगाल पोलिसांच्या उपस्थितीत टीएमसीच्या गुंडांच्या टोळीने एका पत्रकाराला रस्त्यावर पाडून मारहाण केली. सोमवारी रात्री बीरभूम जिल्ह्यातील सुरी येथे पक्षाविरोधात न्यूज दिल्यामुळे स्थानिक पत्रकार राजा हुसेन यांच्यावर टीएमसीच्या गुंडांनी हल्ला केला.

Political News: अमित शहांच्या रोड शोदरम्यान राडा, टीएमसी अन् भाजप कार्यकर्ते आमने-सामने; एकमेकांची डोकी फोडली
West Bengal Politics: ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का; टीएमसीच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com