

महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर आले.
दोघेही बिनविरोध विजयी झाल्याचे वृत्त आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर महायुतीमधील स्थानिक राजकीय समीकरणांची चर्चा
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर मात्र महायुतीमधील अंतर्गत वादाला तोंड फुटलंय.सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला.
हे दोघेही बिनविरोध विजयी झालेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीत भाजपचा काटा काढल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर आता ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी शंभूराजे देसाई यांच्यासह महायुतीतील नेत्यांना डिवचलंय.
'दम होता तर स्वतंत्र लढायचं होतं,' असा थेट टोला जयकुमार गोरे यांनी लगावलाय. एवढेच नाही, तर जखम भरून काढण्यासाठी अघोरी विद्या वापरली तर त्याचे गंभीर परिणाम होतात, असं सूचक विधानही गोरेंनी केलंय. आमच्या मतावर निवडून आलेल्या संचालकांनी चेअरमन निवडला आहे. दम होता तर जिल्हा परिषदेप्रमाणे स्वतंत्र लढायचे होते मग जखम भरून निघाल्याचा अधिकार होता.
मात्र जखम भरून निघण्यासाठी अघोरी विद्या वापरली तर त्याचे गंभीर परिणाम होतात. अशा शब्दात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा डीसीसी बँक चेअरमन पदाच्या निवडीनंतर शंभूराजे देसाईंसह महायुतीच्या नेत्यांना डिवचलं. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर महायुतीतील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झालीय.
सातारा जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाची आज निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये चेअरमन पदाच्या निवडीच्या चर्चेत मुख्यमंत्री व महायुतीसोबत शिवेंद्रराजे महाराज भोसले होते. शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढलो. त्यामुळे शिवेंद्रराजेंना याबाबत अधिकृत माहिती आहे, असे म्हणत जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत शिवेंद्रराजेंकडे बोट केलंय. तसेच जिल्हा परिषद आणि सातारा जिल्हा बँक निवडणूक याचा परस्पर संबंध नाही. दोन्ही निवडणुका वेगळ्या आहेत. ही निवडणूक शेवटची नाही, असेही यावेळी जयकुमार गोरे म्हणालेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष निवडी सुरू असताना जयंत पाटलांना चीनमध्ये जाऊन तोंड लपवावे लागलं,अशी घणाघाती टीका आमदार भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे..जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडी होत,असताना जयंत पाटील नेहमी नवरदेवाप्रमाणे नटून येतात,असा टोला लगावला आहे..तसेच भाजपामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे, त्यामुळेच विश्वजीत कदम आणि विशाल पाटील जयंत पाटलांना डोळे वाटारत आहेत..असे विधान देखील गोपीचंद पडळकर यांनी केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.