Santosh Deshmukh Case : घुलेच्या मोबाईलने वाढवलं आकाचं टेन्शन, मोबाईल चढवणार आकाला फासावर? स्पेशल रिपोर्ट

Santosh Deshmukh Case Updates : बीड सरपंच हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट मिळालाय. आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधला सर्व डेटा सीआयडीच्या हाती लागलाय. यामुळे आता आका आणि आकाच्या आकाचं टेंशन वाढलंय. नेमकं काय आहे या मोबाईलमध्ये त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Santosh Deshmukh Case Update
Santosh Deshmukh Case UpdateSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Santosh Deshmukh Case : सरपंच हत्या प्रकरणाला 2 महिने उलटून गेले आहेत.. या प्रकरणात वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय...सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडीओ काढणाऱ्या सुदर्शन घुलेच्या मोबाईलचा डेटा सीआयडीने रिकव्हर केल्याची माहिती समोर आलीय. तर विष्णू चाटेच्या गायब असलेल्या मोबाईलमधील डेटाही रिकव्हर करण्यात सीआयडीला यश मिळाल्याची माहिती सीआयडीने धनंजय देशमुखांना दिलीय.

9 डिसेंबर 2024 ला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निघृण हत्या करण्यात आली. त्यानंतर प्रतिक घुले, जयराम चाटे, महेश केदार आणि विष्णू चाटेला अटक करण्यात आली होती.. तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, वाल्मिक कराड हे आरोपी पोलीसांना गुंगारा देत होते.

Santosh Deshmukh Case Update
Maharashtra Politics : "त्यांचा चेहराच गंभीर आहे.." एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

पोलिसांनी सांगळे आणि घुलेला अटक केल्यानंतर कराडनेही शरणागती पत्करली. मात्र विष्णू चाटेने मोबाईल गायब केल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा मोबाईलमधील डेटा सीआयडीने रिकव्हर केल्याने थेट वाल्मिक कराडचे धाबे दणाणले आहेत. कारण सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या टोळीचा असल्याचं सीसीटीव्हीतून समोर आलंय. त्यामुळे आता घुले आणि चाटेच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात आल्याने आकासह त्याच्या आकाचंही टेंशन वाढणार एवढं नक्की.

Santosh Deshmukh Case Update
Devendra Fadnavis : अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा ठाकरेंना शब्द दिला होता का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, "त्यांनी रंग.."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com