PM मोदी अन् अभिजीत दीपकेंची अमेरिकेत गुप्त भेट; खासदाराच्या दाव्यानं चर्चांना उधाण

CJP-BJP Link Row Raut’s Allegation : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांची अमेरिकेत गुप्त भेट झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
CJP-BJP Link Row Raut’s Allegation :
Sanjay Raut claims Narendra Modi met Abhijit Deepke in Americasaam tv
Published On
Summary
  • अभिजित दीपके आणि नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील कथित भेटीचा दावा

  • दाव्यानंतर कॉकरोच जनता पार्टी आणि भाजपच्या संबंधांवर चर्चा सुरू

  • नीट पेपरफुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टी केंद्र सरकारविरोधात आक्रमक

कॉकरोच जनता पार्टीनं नीट पेपरफुटी प्रकरणावरून सरकारची कौंडी केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके करत आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीमाना घेतल्याशिवाय आता माघार घ्यायची नाही असा निर्धार कॉकरोच जनता पार्टीनं केलाय. त्यापार्श्वभूमीवर सीजीपे पुण्यात आंदोलन करत आहे. मात्र त्याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अभिजीत दीपके यांच्याविषयी मोठं विधान केलंय.

CJP-BJP Link Row Raut’s Allegation :
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटायचं नाही;कॉकरोच जनता पार्टीनं रणशिंग फुंकलं!

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत मिटींग झाली. त्या मिटींगनंतरच दिपके भारतात आला असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. अभिजीत दीपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्या भेटीचा फोटो आपल्याला एकाने पाठवला असल्याचंही संजय राऊत म्हणालेत. राऊतांच्या दाव्यामुळे अभिजीत दिपके आणि भाजप यांचं काही कनेक्शन आहे का याबाबतच्या चर्चांना सुरू झाल्या आहेत.

CJP-BJP Link Row Raut’s Allegation :
cockroach janata party : 'कॉकरोच' पार्टी देशभरात कुठं-कुठं आंदोलन करणार? अभिजीत दीपकेनं शहरांची नावं केली जाहीर, पुण्यातून सुरुवात

अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, त्याचे आपल्याकडे आहेत. त्या भेटीनंतरच दिपके भारतात आले, अशी माहिती काही लोकांनी दिली आहे. हे आरोप नसून माझी माहिती लोकांनी पोहोचवलेली आहे,तेच मी सांगत आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेला समर्थन दिलं, मात्र जेव्हा काही माहिती या सगळ्या संदर्भात समोर येते, तेव्हा माध्यमांसमोर मांडणे आवश्यक असल्याचं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता त्या आंदोलनाला गेला नाही. तरुणांचे प्रश्न आणि तरुणांना आम्ही पाठिंबा दिला. जे तरुण रस्त्यावर उतरले आहेत, त्या तरुणांचे सरकारने ऐकायला हवं यासाठी आम्ही भूमिका मांडली. या माध्यमातून सरकारला मदत करत असेल तर त्यावर लक्ष ठेवणं आमचं काम आहे, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com