cockroach janata party : 'कॉकरोच' पार्टी देशभरात कुठं-कुठं आंदोलन करणार? अभिजीत दीपकेनं शहरांची नावं केली जाहीर, पुण्यातून सुरुवात

cockroach janta party announces nationwide protests : दिल्लीतील जंतर-मंतरनंतर अभिजीत दीपकेची कॉकरोच जनता पार्टी उद्या, गुरुवारी पुण्यात आंदोलन करणार आहे. त्यानंतर या आंदोलनाला आणखी धार येणार आहे. देशभरातील विविध शहरांत कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करणार आहे. तशी घोषणा दीपकेनं केलीय.
कॉकरोच पार्टीच्या अभिजीत दीपकेची मोठी घोषणा, पुण्यानंतर या शहरांमध्ये आंदोलन करणार
Cockroach Janta Party abhijeet deepkesaam tv
Published On

नीट पेपरफुटीवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आणखी धार येणार आहे. हे आंदोलन देशव्यापी होणार असल्याची घोषणाही संस्थापक अभिजीत दीपके यानं केली आहे. या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात पुण्यातून होत आहे. त्यानंतर लखनऊ, बेंगळुरूसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती दीपकेनं दिली.

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या कॉकरोच जनता पार्टीनं आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. संस्थापक अभिजीत दीपके यानं यासंदर्भात घोषणा केलीय. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नसतील तर देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात येईल. त्याची सुरुवात पुण्यापासून होत आहे. त्यानंतर लखनऊ, अमृतसर, बेंगळुरूसह अनेक शहरांमध्ये आंदोलन करण्यात येईल, असं दीपकेनं सांगितलं.

अभिजीत दीपके यानं पुण्यात पत्रकार परिषद घेतली. ६ जून रोजी दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलनाला विद्यार्थी, तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता आंदोलनाची व्यापी वाढवणार असून, पुण्यात मोठे आंदोलन केले जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यास परवानगी मिळाली आहे, अशी माहितीही दीपके यानं दिली.

२० जूनला पुन्हा जंतर-मंतर

सरकारनं आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर, २० जून रोजी दिल्लीच्या जंतर-मंतरवर पुन्हा मोठं आंदोलन करण्यात येईल, असेही दीपकेने सांगितले. हा केवळ परीक्षेचा मुद्दा नाही, तर देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. त्यामुळेच आंदोलनाला व्यापक स्वरूप दिले जाणार आहे, असे दीपके म्हणाला.

विद्यार्थ्यांना भावनिक पत्र

पुण्यातील आंदोलनाआधी अभिजीत दीपके यानं विद्यार्थी, पालक आणि देशातील तरुणांना भावुक पत्र लिहिलं. सोशल मीडियावर ते पत्र शेअर केलं आहे. या मुर्दाड व्यवस्थेने पुण्याची मान शरमेने खाली घालायला लावली. इतके सगळे होत असताना आपण बघ्याची भूमिका घ्यायची का? असा सवालही त्यानं पत्रातून केला आहे. कदाचित तुमचे आणि माझे विचार वेगळे असतील. मतमतांतरे असू शकतात. त्याचा मी आदर करतो. पण शिक्षणाच्या प्रश्नावर आपण एकत्र येऊन काम करू शकतो. एकत्र येऊया आणि व्यवस्थेला जाब विचारूया, असं आवाहनही त्यानं केलं.

आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन आवाज उठवायला हवा. आपले मुद्दे ऐकून घेतले नाहीत तर आपल्याला एकत्र यायला हवे. कधीपर्यंत या देशात विद्यार्थी आत्महत्या करत राहणार, पेपर लीक होत राहणार...पण इतके होऊनही मंत्री खुर्चीवर बसूनच राहतील. तुमच्याकडून एक चूक झाली तर तुमचं भविष्य उद्ध्वस्त होईल. पण यांच्या चुकांवर चुका होत आहेत, तरीही राजीनामा देत नाहीत. आपल्यालाच आता जबाबदारी निश्चित करावी लागेल. त्यामुळे तुम्ही आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही दीपके यानं केलं.

कॉकरोच पार्टीच्या अभिजीत दीपकेची मोठी घोषणा, पुण्यानंतर या शहरांमध्ये आंदोलन करणार
cockroach janata party : भेटूया पुण्यात, जय महाराष्ट्र! अभिजीत दीपकेची घोषणा; कॉकरोच जनता पार्टी करणार पुण्यात आंदोलन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com