cockroach janata party : भेटूया पुण्यात, जय महाराष्ट्र! अभिजीत दीपकेची घोषणा; कॉकरोच जनता पार्टी करणार पुण्यात आंदोलन

Cockroach Janta Party Protest in Pune : कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके यानं दिल्लीनंतर आता पुण्यात आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केलं.
कॉकरोच जनता पार्टी पुण्यात करणार आंदोलन, अभिजीत दीपकेची माहिती
Abhijeet Dipke Cocrcockroach janata party saam tv
Published On

सचिन जाधव, पुणे | साम टीव्ही

कॉकरोच जनता पार्टी आता पुण्यात आंदोलन करणार आहे. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके यानं ही घोषणा केली आहे. ११ जून रोजी पुण्यात हे आंदोलन होईल. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. दिल्लीतील जंतर - मंतरवर आंदोलन केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टी हे दुसरं आंदोलन करणार आहे.

दिल्लीत जंतर-मंतरवर ६ जून रोजी कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन केलं होतं. पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हा या आंदोलनात सहभागी झाला होता. तिथेही त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. आता दिल्लीनंतर थेट महाराष्ट्रातील पुण्यात आंदोलन करण्यात येणार आहे.

दीपके आणि पक्षाच्या वतीने या आंदोलनाबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. महाराष्ट्रातील पुण्यात आंदोलन करण्यात येणार असून, शिक्षण मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. येत्या गुरुवारी (ता. ११) संध्याकाळी ४ वाजता पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात या आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिल्लीत पहिलं आंदोलन

कॉकरोच जनता पार्टीच्या घोषणेनंतर पक्षाने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी शनिवार, ६ जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवर पहिलं आंदोलन केले होते. या आंदोलनात विद्यार्थ्यांसह नागरिक सहभागी झाले होते. पक्षाचा संस्थापक अभिजीत दीपके हा या आंदोलनासाठी अमेरिकेहून दिल्लीत पोहोचला होता. सोनम वांगचूक हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. जंतर-मंतरवरील आंदोलनात अनेक नागरिक कॉकरोचचे मुखवटे घालून आले होते. अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत जंतर - मंतरवर आले होते.

कॉकरोच जनता पार्टी पुण्यात करणार आंदोलन, अभिजीत दीपकेची माहिती
CJP Protest: तिरंगा आणि पुस्तक आणा, सनस्क्रीन लावा...; आंदोलनासाठी कॉकरोच पार्टीची गाईडलाईन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com