आमदार संजय गायकवाड हाजिर हो...; कोर्टाने पोलिसांना दिले निर्देश

Court Allows Investigation Against Sanjay Gaikwad In Threat Case: शिवाजी कोण होता या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादात आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाचा मोठा धक्का बसला आहे.
MLA Sanjay Gaikwad reacts after court permits police investigation in threat case linked to Shivaji book controversy.
MLA Sanjay Gaikwad reacts after court permits police investigation in threat case linked to Shivaji book controversy.saam tv
Published On

गोविंद पानसरे यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकवल्याप्रकरणी आणि शिवीगाळ करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्यास परवानगी दिली असून प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुर पोलीस ठाण्यात संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती.

MLA Sanjay Gaikwad reacts after court permits police investigation in threat case linked to Shivaji book controversy.
उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा मोठा दणका! बड्या निष्ठावंताने सोडली साथ, 250 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये करणार प्रवेश

या संदर्भात वकील असीम सरोदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. पोलिसांनी त्यावेळी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. मात्र आत न्यायालयाने आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी दिली असून या प्रकरणात पुढील कारवाईला गती मिळू शकते. दरम्यान प्रशांत आंबी यांना अजूनही आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्यांचे फोन सुरूच आहेत. गेल्या महिन्याभरापासून शंभरपेक्षा अधिक धमक्यांचे फोन आले असून आपण याबाबत पोलिसांकडे नव्याने तक्रार देणार असल्याचे प्रशांत आंबी यांनी म्हटले.

MLA Sanjay Gaikwad reacts after court permits police investigation in threat case linked to Shivaji book controversy.
Aditya Thackeray News | भर मंचावरुन आदित्य ठाकरे यांनी Cm Eknath Shinde यांची ॲक्टींग केली

मी माझ्या भूमिकेवर ठाम- आमदार संजय गायकवाड

छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल जी काही मी शिवीगाळ केली होती. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढेही शिवरायांचा अपमान करणाऱ्याचा विषय असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात दगलबाज शिवाजी शिवाजी कोण होता या पुस्तकांवर बंदी आणण्याकरता मी मुख्यमंत्री साहेबांना आग्रही असणार आहे. याविषयी माननीय न्यायालयाने जे काही आदेश दिले असतील, पोलिसांना सहकार्य करण्यास मी तयार आहे, असे गायकवाड म्हणाले.

MLA Sanjay Gaikwad reacts after court permits police investigation in threat case linked to Shivaji book controversy.
Maharashtra Heatwave: महाराष्ट्रात उष्णतेची लाट! विदर्भ चाळीशीपार; अकोला, अमरावतीसह ८ शहरांमध्ये सर्वाधिक तापमान

तसेच माझे महाराष्ट्र भर समर्थक आहेत. अशा अज्ञात समर्थकांकडून प्रशांत आंबी यांना धमक्या दिल्या जात असतील. शिवाजी महाराज यांचा अपमानामुळे त्यांच्या भावना भडकत असतील तर त्याला मी काही करू शकत नाही, असे स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com