Maharashtra Heatwave: महाराष्ट्रात उष्णतेची लाट! विदर्भ चाळीशीपार; अकोला, अमरावतीसह ८ शहरांमध्ये सर्वाधिक तापमान

Maharashtra Heatwave: महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र झाली असून विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमानाने चाळीशी पार केली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे.
Maharashtra Heatwave:
MAHARASHTRA HEATWAVE ALERT: VIDARBHA RECORDS TEMPERATURE ABOVE 40°Csaam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट येण्याचा इशारा.

  • विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमान चाळीशीपार.

  • अकोला, अमरावतीसह ८ शहरांमध्ये उच्च तापमानाची नोंद.

महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याची शक्यता हवामान विभाने वर्तवली आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्याचे तापमान मोठी वाढ झाली आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सखाराम सणप यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात तीव्र उष्णतेची स्थिति निर्माण होऊ शकते. या वाढत्या उष्णतेमुळे उष्माघातामुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागत आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील जेऊर येथे उष्माघातामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.

Maharashtra Heatwave:
Maharashtra Weather: वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात पुढील तीन दिवस उन्हाचा तडाखा वाढणार आहे. बहुतांश जिल्ह्याना उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी पुढील 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. महाराष्ट्राच्या अनेक भागात तापमान आधीच 40 डिग्री C च्या वर गेले असून काही जिल्ह्यामध्ये धोकादायक पातळी गाठली आहे. राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये अकोला आणि नंदुरबार, अमरावतीसह ८ शहरांचा समावेश आहे.

Maharashtra Heatwave:
Maharashtra Heatwave: सूर्य आग ओकणार... महाराष्ट्रात पुढील ३ दिवस उष्णतेची तीव्र लाट; कोणत्या जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी

तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर अमरावती आणि अकोला जिल्ह्यात उद्यापासून सलग ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.

अकोला - ४५.६

अमरावती - ४५.४

बुलढाणा- ४३.५

ब्रह्मपुरी-४३.५

चंद्रपुर-४२.२

वर्धा- ४४.२

वाशिम- ४३.४

नागपूर-४३.०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com