Maharashtra Heatwave: सूर्य आग ओकणार... महाराष्ट्रात पुढील ३ दिवस उष्णतेची तीव्र लाट; कोणत्या जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी

Maharashtra Heatwave Alert Districts List 2026: महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट येणार असून अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमान 45°C च्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांना उष्माघातापासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
People shield themselves from the blazing sun as temperatures soar during a severe heatwave in Maharashtra.
People shield themselves from the blazing sun as temperatures soar during a severe heatwave in Maharashtra.saam tv
Published On

महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल असा इशारा भारतीय हवामान विभगाने (IMD) दिला आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सखाराम सणप यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात तीव्र उष्णतेची स्थिति निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अनेक जिल्हयासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

People shield themselves from the blazing sun as temperatures soar during a severe heatwave in Maharashtra.
NEET UG Exam: मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नाशिकमधून एकाला ताब्यात घेतलं

महाराष्ट्राच्या अनेक भागात तापमान आधीच 40 डिग्री C च्या वर गेले असून काही जिल्ह्यांत अत्यंत धोकादायक पातळी गाठली आहे. राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये अकोला आणि नंदुरबार यांचा समावेश असून तिथे 45.3 C पेक्षा जास्त तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

People shield themselves from the blazing sun as temperatures soar during a severe heatwave in Maharashtra.
जमिनीचे तुकडे लेआऊट मंजुरीशिवाय विकता येणार नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय

उत्तर आणि मध्य महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा

उष्णतेच्या लाटेची तीव्रता पाहता उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, पावसाची चिन्हे अजिबात नाहीत. पावसामुळे मिळणारा दिलासा सध्यातरी मिळणार नसल्याने उष्णतेचा त्रास अधिक वाढू शकतो.

आरोग्य विभागाचा इशारा: वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा (Heatstroke) धोका वाढला आहे. विशेषतः मुले, ज्येष्ठ नागरिक, उन्हात काम करणारे कामगार आणि आजारी असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

People shield themselves from the blazing sun as temperatures soar during a severe heatwave in Maharashtra.
Aditya Thackeray News | भर मंचावरुन आदित्य ठाकरे यांनी Cm Eknath Shinde यांची ॲक्टींग केली

नागरिकांसाठी महत्त्वाची नियमावली (Advisory)

प्रशासनाने नागरिकांना खालील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे

दुपारच्या वेळी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा.

भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा.

हलकी सुती वस्त्रे परिधान करा.

थेट सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहणे टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com