Politics : सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचा तिढा कायम, अध्यक्षपदाबाबत अजित पवार गटाच्या भूमिका ठरली, एक अट ठरणार निर्णायक

Sangli zilla parishad ajit pawar faction : सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचं गणित अद्याप सुटलं नाही. जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा पेच कायम, अजित पवार गटाची साथ कुणाला? महाविकास आघाडी की महायुती?
Sangli ZP president NCP Ajit Pawar Group Meetingsaam tv
Published On
Summary
  • सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा तिढा कायम

  • राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट

  • जो पहिल्यांदा अध्यक्षपद देईल, त्यांच्यासोबत जाणार

  • अजित पवार गटाची ठाम भूमिका

विजय पाटील, सांगली | साम टीव्ही

सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा तिढा अद्याप कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले असून, पहिल्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षपद जो कोणी देईल, त्याला पाठिंबा देण्यात येईल, अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जाहीर करण्यात आली आहे.

सांगलीच्या मिरजेमध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी शिराळा तालुक्यातील राजेश्वरी नाईक यांची निवड करण्यात आली. माजी खासदार संजयकाका पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी मंत्री अजित घोरपडे, माजी मंत्री शिवाजी नाईक, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य या बैठकीला उपस्थित होते.

सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा पेच कायम, अजित पवार गटाची साथ कुणाला? महाविकास आघाडी की महायुती?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदेगटात खलबतं, एकनाथ शिंदेंनी बोलावली महत्वाची बैठक

या बैठकीमध्ये जिल्हा परिषद गटनेतेपदी नाईक यांची निवड करण्यात आली. मात्र जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडी की महायुतीला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय अद्याप झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जो कोणी, पहिल्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देईल, त्यांना पाठिंबा देण्याबाबत पक्षाच्या नेतृत्वासोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल,अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला भाजपप्रणित महायुती की महाविकास आघाडी संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा पेच कायम, अजित पवार गटाची साथ कुणाला? महाविकास आघाडी की महायुती?
Sangli Accident: हिट अँण्ड रनचा थरार; मद्यधुंद कार चालकाने १४ ते १५ जणांना उडवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com