Maharashtra Politics: शिवसेना शिंदेगटात खलबतं, एकनाथ शिंदेंनी बोलावली महत्वाची बैठक

Deputy CM Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिंदेसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी शिंदेसेनेतून अनेक जण इच्छुक आहेत.

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील मोठ्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलवली आहे. राज्यसभेसंदर्भात आज दुपारनंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. शिंदेसेनेकडे राज्यसभेची एक जागा आहे. पण शिंदेसेनेत इच्छुकांची गर्दी जास्त आहे. याचाच मार्ग काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीमध्येच राज्यसभेच्या एका जागेवर कोणत्या नेत्याला पाठवायचे ते ठरवले जाणार आहे. दरम्यान, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ७ जागांमसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार रिक्त होणाऱ्या ७ जागांपैकी भाजपला ४ जागा, शिवसेना शिंदे गटाला १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १ जागा येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. शिंदेगटाकडून कुणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com