Sangli Accident: हिट अँण्ड रनचा थरार; मद्यधुंद कार चालकाने १४ ते १५ जणांना उडवलं

Sangli Accident: हिट अँण्ड रनचा थरार; मद्यधुंद कार चालकाने १४ ते १५ जणांना उडवलं

Sangli Hit And Run: सांगलीच्या टिळक चौकात एका मद्यधुंद चालकाने १४ ते १५ जणांना उडलवलंय. यामध्ये सहा पोलीस कर्मचारी आहेत.
Published on
Summary
  • सांगलीच्या टिळक चौकात मद्यधुंद चालकाने कारने गर्दीत घुसखोरी केली.

  • 14 ते 15 जण जखमी; त्यामध्ये 6 पोलिसांचा समावेश.

  • जखमींवर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.

सांगलीच्या टिळक चौकामध्ये हिट आणि रणचा थरारची घटना घडलीय. एका मद्यधुंद वाहन चालकाने 14 ते 15 जणांना कारने उडवले. या सर्व जखमीना सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. यामध्ये सहा पोलिसांचा समावेश आहे. दरम्यान मद्यधुंद चालकाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेनंतर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींना दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलंय. नातेवाईकांनी सुद्धा गर्दी केली आहे. यामध्ये जखमींमध्ये कोणीही गंभीर स्वरूपाची दुखापत झालेला नाही, असे पोलिसांनी सांगितले असले तरी जखमींवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com