Sangli Accident: भीषण अपघातात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू, महामार्गावरील अपघाताचा थरारक VIDEO

Sangli Gramsevak Killed in Horrific Highway: सांगलीमध्ये महामार्गावर भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ग्रामसेवकचा जागीच मृत्यू झाला. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
Sangli Accident: भीषण अपघातात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू, महामार्गावरील अपघाताचा थरारक VIDEO
Sangli Accident Saam Tv
Published On
  • सांगलीतील ग्रामसेवकाचा भीषण अपघातात मृत्यू

  • नागपूर= रत्नागिरी महामार्गावरील घटना

  • भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक

  • अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

विजय पाटील, सांगली

भीषण रस्ते अपघातामध्ये सांगलीतील ग्रामसेवकाचा जागीच मृ्त्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर ही अपघाताची घटना घडली. ग्रामसेवकाच्या भरधाव कारने महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या ग्रामसेवकाने जागीच प्राण सोडले. हा अपघात महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू झाला. सांगलीच्या जतमधील कोसारीचे ग्रामसेवक महेश मनोहर भमाणे यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामसेवक महेश भमाणे हे जतवरून मिरजच्या दिशेने जात होते. त्यावेळी ही अपघाताची भयंकर घटना घडली.

Sangli Accident: भीषण अपघातात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू, महामार्गावरील अपघाताचा थरारक VIDEO
Mumbai Accident : बीएमसीच्या गाडीची मायलेकराला धडक; यारी रोड परिसरात खळबळ

ग्रामसेवक महेश भमाणे यांची कार कळंबी गावाजवळ आल्यानंतर कार महामार्गाच्या पहिल्या लेनवरून थेट तीन लेन ओलांडून महामार्गाच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होत की यामध्ये कारचा चक्काचूर झाला आणि महेश भमाणे यांचा जागीच मृत्यू झाला.

Sangli Accident: भीषण अपघातात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू, महामार्गावरील अपघाताचा थरारक VIDEO
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

दरम्यान या अपघाताचा थरार महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. या अपघाताची माहिती मिळतचा मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिस या अपघाताचा अधिकचा तपास करत आहेत.

Sangli Accident: भीषण अपघातात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू, महामार्गावरील अपघाताचा थरारक VIDEO
Accident News : भरधाव बस काळ बनून आली, रिक्षाला १०० मीटरपर्यंत फरफटत नेले; देवदर्शनाला जाणाऱ्या एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com