Shocking : संतापजनक! ST महामंडळाच्या अधिकाऱ्याकडून कर्मचारी महिलेचा विनयभंग; शरीरसुखाचीही केली मागणी

Sangali Crime News : सांगली एसटी आगारात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग व छळ केल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिक विनायक कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
SENIOR CLERK BOOKED FOR MOLESTATION OF WOMAN EMPLOYEE AT SANGLI ST DEPOT
SENIOR CLERK BOOKED FOR MOLESTATION OF WOMAN EMPLOYEE AT SANGLI ST DEPOTSaam Tv
Published On
Summary
  • सांगली एसटी आगारातील वरिष्ठ लिपिकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

  • महिला कर्मचाऱ्यावर दोन वर्षांपासून मानसिक व शारीरिक छळ

  • शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला

  • संतप्त नातेवाईकांनी आगारात जाऊन आरोपीला मारहाण

विजय पाटील, सांगली

Sangali Crime News सांगलीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) एका कर्मचाऱ्याने महिलेचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विनायक कदम (Vinayak Kadam ) असं आरोपीचं नाव आहे. या घटनेमुळे सांगली आगारात मोठी खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणाची शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनायक कदम हा सांगली आगारात वरिष्ठ लिपिक म्हणून काम पाहत होता. त्याच ठिकाणी कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यावर त्याची घाणेरडी नजर होती. गेल्या दोन वर्षांपासून विनायक कदम हा महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. संबंधित महिला कर्मचाऱ्याने याबाबत वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, तिच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

SENIOR CLERK BOOKED FOR MOLESTATION OF WOMAN EMPLOYEE AT SANGLI ST DEPOT
Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

महिलेच्या म्हणण्यानुसार, विनायक कदम याच्याकडून वारंवार अयोग्य वर्तन केले जात होते. तसेच त्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोपही पीडित महिलेने केला आहे. सातत्याने होणाऱ्या या त्रासामुळे महिला मानसिक तणावाखाली होती. अखेर तिने हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सांगली आगारात धाव घेतली. विनायक कदम याला जाब विचारला. यावेळी वाद वाढत गेला आणि संतप्त नातेवाईकांनी त्याला मारहाण केल्याची घटना घडली.

SENIOR CLERK BOOKED FOR MOLESTATION OF WOMAN EMPLOYEE AT SANGLI ST DEPOT
Weather Update : पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून, महाराष्ट्रात वादळी पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

या प्रकारामुळे काही काळ आगार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात विनायक कदम याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कार्यालयात घुसून मारहाण केल्याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांविरोधातही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीसांकडून चौकशी सुरू असून दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com