Sangli Crime:चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना उलटं टांगलं; एक मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू

Shocking Crime in Sangli : चोरी केल्याच्या संशयातून वडिलांनी आपल्या दोन मुलींना रात्रीभर घरात उलट टांगून ठेवलं. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात ही धक्कादायक घटना घडली.
Shocking Crime in Sangli :
चोरीच्या संशयातून वडिलांनी मुलींना उलट टांगल्याची संतापजनक घटना; एका मुलीचा मृत्यूsaam tv
Published On

विजय पाटील, साम प्रतिनिधी

एका बापाने क्रुरपणाची सीमा ओलांडली आहे. चोरी केल्याच्या संशयातून आपल्या दोन्ही मुलींना थेट उलट लटकून ठेवल्याची घटना घडली यात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्याच्या बनपुरी मध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे.या प्रकरणी निर्दयी दादू यमगर या बापाला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Shocking Crime in Sangli :
Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

यमगर यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने दोन्ही मुलींच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला, त्यानंतर संतापलेल्या दादू यमगर यांनी आपल्या दहा व तेरा वर्षीय अनुजा व सारिका या दोन्ही मुलींना घरात रात्रभर खुंटीला उलट टांगून ठेवलं. यामध्ये सारिका यमगारीचा तडफडून मृत्यू झाला आहे.. तर अनुजा किती प्रकृती गंभीर असून तिच्यावर आटपाडीतील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

Shocking Crime in Sangli :
Crime News: पुणे हादरलं! ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; पीडितेच्या आई-वडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

दरम्यान आटपाडी पोलिसांकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा तक्रार झाली नसल्याचं पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांनी सांगितले आहे.मात्र या घटनेने आटपाडी तालुका सुन्न झाला आहे. दोन्ही त्या चिमुकल्या रात्रभर वेदनेने तडफडत 'पाणी, पाणी' अशी आर्त हाक देत होत्या. मात्र निर्दयी आई-वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही.

वेदना असह्य झाल्याने सानिकाने रात्रीच प्राण सोडले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी मृत आणि उलटी टांगलेल्या अवस्थेत असतानाही आई-वडील त्या खाली निवांत झोपले होते. गुरुवारी सकाळी आजोबांनी मुलींना खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सानिका मृतावस्थेत आढळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com