Beed: लग्न जमवतो अन् पोटाचा आजार दूर करतो, संगमनेरच्या भोंदू गडगेचे आणखी एक कांड उघड

Beed Crime: बीडमधील तरुणाला संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगेने फसवलं. लग्न जमवतो अन् पोटाचा आजार दूर करतो म्हणत हजारो रुपयांना गंडा घातला. या भोंदूबाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Beed: लग्न जमवतो अन् पोटाचा आजार दूर करतो, संगमनेरच्या भोंदू गडगेचे आणखी एक कांड उघड
Beed Crime Saam Tv
Published On

Summary -

  • भोंदू गडगेकडून बीडच्या तरुणाची फसवणूक

  • आजार बरा आणि लग्न जमवण्याचे खोटे आश्वासन

  • २२ हजार रुपये लुटल्याचा आरोप

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

योगेश काशिद, बीड

मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करून फसवणूक करणाऱ्या संगमनेर येथील भोंदू राजेंद्र गडगेचे आणखी एक कांड समोर आले आहे. या भोंदूने बीडच्या तरुणाची फसवणूक केली. पोटाचा आजार दूर करतो आणि लग्न जमवून देतो असे सांगून या तरुणाला हजारो रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोटाचा आजार दूर करतो आणि लग्न जमवतो म्हणून संगमनेरच्या भोंदू गडगेने तरुणाची फसवणूक केली. गडगे महाराजांनी या तरुणाकडून तब्बल २२ हजार रुपये उकळल्याची माहिती या युवकाने दिली. माजलगावच्या इतर काही तरुणांनाही या भोंदूबाबाने फसवल्याचे तरुणाने सांगितले. याबाबत तरुणाने भोंदू गडगेविरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. इतकच नाही तर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी या तरुणाने केली आहे.

Beed: लग्न जमवतो अन् पोटाचा आजार दूर करतो, संगमनेरच्या भोंदू गडगेचे आणखी एक कांड उघड
भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेर येथील भोंदू राजेंद्र गडगेवर कारवाईसाठी संगमनेर पोलिसांना निवेदन दिले होते. दरम्यान गडगेने एका स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल करत अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांचे कार्यकर्ते आपल्याकडे पैसे मागत असल्याचा दावा केला होता. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी हा दावा खोडत त्याने माझ्या फोटोचा दुरुपयोग करून पैसे मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. आमच्या बदनामीच्या संबंधाने देखील मी गुन्हा दाखल केला असल्याचे गवांदे यांनी सांगितले. दरम्यान राजेंद्र गडगेने आपल्या सोशल माध्यमावर टाकलेला स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ आता डिलीट केल्याने हे स्टिंग त्यानेच क्रिएट केले होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Beed: लग्न जमवतो अन् पोटाचा आजार दूर करतो, संगमनेरच्या भोंदू गडगेचे आणखी एक कांड उघड
Mumbai Bhondu: महाराष्ट्राला भोंदूबाबाचा विळखा, भूत उतरवण्याच्या नावाखाली मुंबईकरांना गंडा; पाहा VIDEO

दरम्यान, मंत्रोच्चार, तथाकथित औषधे आणि चमत्कारांच्या नावाखाली कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू गडगेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर संगमनेर पोलिसांनी गडगेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणात फक्त राजेंद्र गडगेच नाही तर त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शिंदे, मधुकर शिंदे आणि डॉक्टर मोहन पुरी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करण्याचे खोटे दावे करून लोकांची लाखो रुपयांची लूट केली. त्याने दिलेल्या औषधांमुळे अनेक रुग्णांना त्रास झाला आहे.

Beed: लग्न जमवतो अन् पोटाचा आजार दूर करतो, संगमनेरच्या भोंदू गडगेचे आणखी एक कांड उघड
Mumbai Bhondu: महाराष्ट्राला भोंदूबाबाचा विळखा, भूत उतरवण्याच्या नावाखाली मुंबईकरांना गंडा; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com