भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

Ashok Kharat: शिर्डीत 4 एकर जमीन बळकावल्याप्रकरणी भोंदू बाबा अशोक खरात यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सचिन बनसोडे, साम टीव्ही

भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शिर्डी येथे 4 एकर भूखंड बळकावल्याप्रकरणी अशोक खरातसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावकारकीच्या जाळ्यात अडकवून मूळ मालक रावसाहेब गोंदकर यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोघांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

तसेच या प्रकरणाच्या अनुषंगाने शिवनिका संस्थानच्या उपाध्यक्षांचीही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान अशोक खरात यांच्याशी संबंधित कोट्यवधींची मालमत्ता आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com