Mobile Blast
Mobile BlastSaam tv

Mobile Blast: चार्जिंग केलेल्या मोबाईलचा खिशातच स्फोट; विद्यार्थी जखमी

Sambhajinagar News चार्जिंग केलेल्या मोबाईलचा खिशातच स्फोट; विद्याथीं जखमी
Published on

नवनीत तापडिया 
छत्रपती संभाजीनगर
: खाजगी शिकवणीसाठी जाणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्यांच्या खिशातील मोबाईलचा (Mobile) अचानक स्फोट झाला. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र मुलाचा पाय भाजला गेला आहे. ही घटना आज (Sambhajinagar) सकाळी आठ वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यात घडली. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

Mobile Blast
Kopargaon Political News: विधानसभेचे तिकीट कुणाला? कोपरगाव मतदार संघात राष्ट्रवादी व भाजपमध्ये कलगीतुरा

आदेश आप्पासाहेब झोजे असे मोबाईलच्या स्फोटामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. नियमित वेळेनुसार आदेश हा सकाळी लवकर उठला चार महिन्यापूर्वी विकत घेतलेल्या मोबाईल चार्जिंगला लावला. तोपर्यंत तयारी करत होता. त्यानंतर चार्जिंग झालेला मोबाईल घेऊन आदेश खाजगी शिकवणीसाठी घराबाहेर पडला. ट्युशन साडेआठ वाजता असल्याने तो आठ वाजताच घरातून बाहेर पडला. पंधरा मिनिटानंतर ट्युशनच्या जवळ जाताच अचानक आदेशाच्या खिशात असलेल्या मोबाईल गरम होऊन त्याच्यामध्ये स्फोट झाला. 

Mobile Blast
Akola News: सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी गाजर आंदोलन; नागरिकांना वाटले गाजर

जखमी विध्यार्थी रुग्णालयात 

अचानक घडलेल्या घटनेमुळे (Student) आदेश घाबरून गेला होता. यावेळी त्यांनी तात्काळ खिशातील मोबाईल खाली टाकून दिला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोबाईलवर पाणी टाकत आदेशला धीर दिला. या स्फोटामध्ये आदेशच्या मांडीला इजा झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com