Akola News: सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी गाजर आंदोलन; नागरिकांना वाटले गाजर

सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी गाजर आंदोलन; नागरिकांना वाटले गाजर
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

हर्षदा सोनोने 
अकोला
: अकोला शहरातील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची इमारत तयार होऊन चार वर्ष उलटून गेली आहेत. परंतु अद्यापपर्यंत हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (Hospital) पूर्णपणे सुरु झालेले नाही. या हॉस्पिटल करीत आज (Akola) सामाजिक कार्यकर्त्यांनी गाजर आंदोलन केले. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना गाजर वाटप करून प्रशासनाचा निषेध केला. (Breaking Marathi News)

Akola News
Navi Mumbai Airport: दोन सरकारांकडून निर्णय; तरीही नवी मुंबई विमानतळाला दि बां च्या नावाचा प्रस्ताव धुळखात

अकोला शहरात चार वर्षांपासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत बांधण्यात आली. तत्कालीन वैद्यकीय आरोग्य मंत्री यांनी सदरचे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल लवकरच सुरू करणार व या ठिकाणी रिक्त असलेली सगळी पदे तात्काळ भरण्यात येणार; असे आश्वासन दिले होते. मात्र तेव्हापासून तर आजपर्यंत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये फक्त ओपीडी सुरू करण्यात आली आहे. 

Akola News
Kopargaon Political News: विधानसभेचे तिकीट कुणाला? कोपरगाव मतदार संघात राष्ट्रवादी व भाजपमध्ये कलगीतुरा

या ठिकाणच्या इतर वैद्यकीय सुविधा अद्यापही जिल्ह्यातील नागरिकांना मिळाल्या नसल्याने आज सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलसमोर गाजर वाटो आंदोलन केले आहे. तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते पराग गवई व त्यांच्या सहकाऱ्यांनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल समोरून जाणाऱ्या नागरिकांना गाजर भेट देत आरोग्यमंत्र्यांसह राज्य शासनाचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com