सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. यासाठी लढा (Navi Mumbai) उभारण्यात आला होता. यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने निर्णय घेतला. तर आताच्या सरकारने देखील यास सहमती दर्शवली होती. तरी देखील हा विषय मागे पडला आहे. (Tajya Batmya)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे; यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्थान्नी मोठा लढा उभारला. अखेर राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षा दरम्यान शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाविकास आघाडीने विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. तर नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारने देखील त्यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत दि. बा. पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील दिला. दोन्हीही सरकारने (Navi Mumbai Airport) निर्णय घेऊनही अद्यापपर्यंत नामांतरणाचा मुद्दा सरकारी अनास्थेपोटी रखडल्याच चित्रं आहे.
युती सरकारला वर्ष उलटले तरी अद्याप राज्य सरकारने केंद्र सरकारला नामांतरणाचा प्रस्तावच पाठवला नसल्याने प्रकल्पग्रस्थ संभ्रमात पडले आहेत. नामांतरणासाठी लढा देणारे अनेक आमदार सरकारमध्ये असूनही सरकारला जाब विचारण्यात येत नसल्याने प्रकल्पग्रस्थ नाराज झाले. नामांतरणाचा निर्णय होऊनही प्रस्ताव रखडल्याने सर्वपक्षीय कृती समितीने आता पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्याचे संकेत दिले असून पुन्हा एकदा सरकार विरुद्ध प्रकल्पग्रस्त असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.