Kalyan News: व्यावसायिक तरुणाने दुध वाटपासाठी केली दुचाकी चोरी; अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Kalyan News व्यावसायिकाने तरुणाने दुध वाटपासाठी केली दुचाकी चोरी; अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख

कल्याण : डोंबिवली रामनगर पोलिसांनी एका दुचाकी चोराला बेड्या ठोकल्यात. गणेश म्हाडसे असे या चोरट्याचे नाव आहे. पोलीस (Police) तपासात त्याने दुचाकी का चोरी केली याचे धक्कादायक (Dombivali) कारण समोर आले. दूध वाटप करण्यासाठी गणेशने दुचाकी चोरी केली आहे. (Latest Marathi News)

Kalyan News
Independence Day: 15 ऑगस्टला तुमच्या इथं कोणता नेता करणार ध्वजारोहण?, सरकारकडून यादी जाहीर; पाहा एका क्लिकवर

गणेश मुरबाड खापरी गावातील राहणारा आहे. गणेशने मुरबाड येथे दुधाचा व्यवसाय सुरु केला होता. दूध टाकण्यासाठी त्याला दुचाकीची गरज होती. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याला दुचाकी विकत घेता येत नव्हती. अखेर त्याने दुचाकी चोरी करण्यासाठी निर्णय घेतला. गणेशने डोंबिवली गाठली. डोंबिवली पूर्वेकडील सारस्वत कॉलनी परिसरातून दुचाकी चोरली. डोंबिवली रामनगर पोलिसांनी चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध सुरु केला व गणेशचा भांडाफोड झाला.

Kalyan News
Kolhapur Crime News: हनुमान मंदिरात मोठी चोरी, ११ किलो चांदी चोरट्यांनी केली लंपास; आरतीसाठी मंदिर उघडताच समोर आली घटना

डोंबिवली रामनगर परिसरात काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी तत्काळ दुचाकी चोरट्याचा शोध सुरू केला. डोंबिवली पूर्व सारस्वत कोंडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाचे आधारे डोंबिवली रामनगर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या गणेश म्हाडसे याला अटक केली. त्याच्या जवळून चोरी केलेली दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com