रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : संदिपान भुमरे या मतदार संघातले आहे का? त्यामुळे त्यांनी कितीही दंड थोपटले तरी त्यांचा या मतदार संघाशी काहीही संबंध येणार नाही. मुळात मागील ३०-४० वर्षापासून संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांची एकच व्याख्या आहे, की सगळं आपल्यालाच मिळावं. आपल्या भावाला मिळावं आणि मुलालाही मिळावं; असा जोरदार हल्लाबोल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी संदिपान भुमरेवर केला आहे. (Live Marathi News)
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आगामी होणाऱ्या निवडणुकीवरून चर्चेची रणधुमाळी सुरू असताना इच्छुक असणाऱ्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सध्या सुरू आहे. दरम्यान पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या टीकेला विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
खैरेसोबत कुठलाही वाद नाही
चंद्रकांत खैरे आणि माझ्यात कुठलाही वाद नसून ते माझे नेतेच आहे. शिवसैनिक हे आक्रमकपणे भांडतही असतात आणि वेळ पडली की पुन्हा एकत्र येत असतात. संघटनेमध्ये काम करत असताना अश्या चर्चा होतच असतात. या चर्चेतूनच पुढचा मार्ग निघत असतो. त्यामुळे माझ्याही मनात काही शंका नसून खैरे यांच्याही मनात काही शंका नाही; असं बोलून त्यांनी या राजकीय वर्तुळात उलट सुलट होणाऱ्या चर्चेला एक प्रकारे पूर्णविराम दिला.
गिरीश महाजनांना टोला
राम मंदिराच्या उदघाटनाची न दिलेल्या आमंत्रणबाबत गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना दानवे यांनी गिरीश महाजन हे सुद्धा काही मोठे व्हीआयपी नेते नाहीत. त्यामुळे महाजन यांच्यावर अधिकच बोलणं मि टाळेल; असे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.