Nylon Manja : नायलॉन मांजावर नाशिकमध्ये बंदी; थेट गुन्हा, हद्दपार, तडीपारीची कारवाई

Nashik News : मकरसंक्रांतीच्या काळात नायलॉन मांजाच्या वापरामुळे माणसांना, प्राणी, पक्षांना इजा होते. तसेच अपघाताच्या देखील अनेक घटना घडत
Nylon Manja
Nylon ManjaSaam tv

नाशिक : येत्या संक्रांतीच्या काळात पतंग उडवण्यासाठी तुम्ही नाशिकमध्ये नायलॉन मांजाचा वापर कराल तर सावधान. कारण नाशिक पोलिसांनी २३ जानेवारीपर्यंत (Nashik) नाशिकमध्ये नायलॉन (police) मांजाच्या वापरावर बंदी घातली असून नायलॉन मांजा वापरल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलाय. (Latest Marathi News)

Nylon Manja
Beed News : कुस्ती लावण्यावरून दोन गट भिडले; मंगरूळ येथे यात्रेमधली घटना

मकरसंक्रांत जवळ आली असल्याने आता पतंग उडविण्यास सुरवात झाली आहे. याकरिता नायलॉन मांजाचा वापर केला जात असतो. मकरसंक्रांतीच्या काळात नायलॉन मांजाच्या वापरामुळे माणसांना, प्राणी, पक्षांना इजा होते. तसेच अपघाताच्या देखील अनेक घटना घडत असल्यामुळे (Nashik Police) पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरात नायलॉन मांजाच्या वापरावर मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार २३ जानेवारीपर्यंत नाशिक शहरात नायलॉन मांजाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nylon Manja
Amalner News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने संपविले जीवन

तर हद्दपारीचीही कारवाई 

या काळात नायलॉन मांजाची विक्री, खरेदी, वाहतूक तसेच नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर दुसऱ्यांदा नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास थेट हद्दपारी अथवा तडीपारीची कारवाई केली जाणार. नाशिक पोलिसांनी तशी अधिसूचना जारी करून नायलॉन मांजाचा वापर न करण्याचं आवाहन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com