रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर शहरासाठी प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु आराखडा तयार झाल्यापासून आतापर्यंत आराखड्यावर ५ हजार आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. (Sambhajinagar) घाईगडबडीने तयार केलेल्या या आराखड्यात अनेक भागावर चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आल्याने हा गोंधळ उडाला आहे. (Live Marathi News)
छत्रपती संभाजीनगर शहराचा प्रारूप आराखडा अतिशय घाईगडबडीत केवळ ३ महिन्यात सादर करण्यात आला आहे. यामुळे या आराखड्यात अनेक भागावर चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आल्याने शहरातील (Development Plan) नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या या आराखड्यावर गेल्या ४० दिवसात आतापर्यंत सुमारे ५ हजार अक्षेप दाखल झाले. आणि सूचना आणि हरकतीसाठी आणखी २० दिवस शिल्लक असल्याने आक्षेपंचा आकडा किमान ७ हजारावर पोहोचण्याची शक्यता आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अजूनही १९८२ च्या आराखड्याप्रमाणे चालतेय काम
विकास आराखडा अभावी मागील ३३ वर्षापासून शहराचा विकास खुंटला आहे. १९८२ सालच्या आराखड्याचीच आजही अंमलबजावणी केली जात असल्याने खुंटलेल्या विकासाला चालना मिळावी; यासाठी ३३ वर्षानंतर विकास आराखड्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र त्यातही अनेक वसाहतीवर अनावश्यकपणे आरक्षण टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.