praniti shinde criticises ram satpute and pm modi solapur lok sabha election
praniti shinde criticises ram satpute and pm modi solapur lok sabha electionSaam Digital

Solapur Constituency : विराेधकांना मतदार ओळखतही नाहीत, माेदी फॅक्टर तर विसराच : प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टाेला

Solapur Lok Sabha Election 2024 : साेलापूर जिल्ह्यात भाजपने कित्येक वर्ष काहीच केले नसल्याची खंत देखील आमदार प्रणिती शिंदेंनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

Praniti Shinde :

सोलापूरच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा एकदा भाजप उमेदवार राम सातपुते यांना डिवचले आहे. भाजप उमेदवार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोणी ओळखत नाही. शिवाय भाजपकडे प्राचाराचे कोणतेही मुद्दे राहिले नाहीत अशी टिका काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज (बुधवार) पंढरपुरात केली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ‌ आज सकाळी येथील संत नामदेव पायरी येथे नारळ फोडून करण्यात आला. उद्या प्रणिती शिंदे महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी शिंदे यांनी मतदारसंघातील सात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन देवदर्शन केले.

praniti shinde criticises ram satpute and pm modi solapur lok sabha election
Success Story : काेराेना काळात नाेकरी गेली, पठ्ठ्याने हार न मानता द्राक्षच्या पंढरीत फुलवली सफरचंदाची बाग

सकाळी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मतदारसंघात कोणी ओळखत नसल्याची टीका केली आहे. यंदाच्या निवडणुकीत माेदी फॅक्टर चालणार नाही असे आमदार शिंदे यांनी नमूद केले. साेलापूर जिल्ह्यात भाजपने कित्येक वर्ष काहीच केले नसल्याची खंत देखील आमदार शिंदेंनी व्यक्त केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

praniti shinde criticises ram satpute and pm modi solapur lok sabha election
Bhiwandi Constituency : भिवंडीत काँग्रेसला पोषक वातावरण, आपलाचा उमेदवार असावा; कार्यकर्त्यांसह पदाधिका-यांची भावना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com