Bhiwandi Constituency : भिवंडीत काँग्रेसला पोषक वातावरण, आपलाचा उमेदवार असावा; कार्यकर्त्यांसह पदाधिका-यांची भावना

Bhiwandi Lok Sabha Election : भिवंडीमध्ये काँग्रेस पक्षाला खूप पोषक वातावरण आहे. राहुल गांधी यांची पदयात्रा झालेली आहे. तरी दोन्ही नेत्यांना मी विनंती केलेली आहे.
congress should contest bhiwandi constituency loksabha seat demands dayanand chorge
congress should contest bhiwandi constituency loksabha seat demands dayanand chorge Saam Digital

- फय्याज शेख

Bhiwandi :

भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी वरिष्ठांनी पुन्हा विचार करावा, काँग्रेससाठी पोषक असं वातावरण आहे. यामुळे ही जागा काँग्रेसला सोडावी असा आग्रह कार्यकर्ते करु लागले आहेत आमचा देखील ताेच विचार असल्याचे काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

चाेरगे म्हणाले मी नानाभाऊ पटोले व बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली आहे. भिवंडीमध्ये काँग्रेस पक्षाला खूप पोषक वातावरण आहे. राहुल गांधी यांची पदयात्रा झालेली आहे. तरी दोन्ही नेत्यांना मी विनंती केलेली आहे.

congress should contest bhiwandi constituency loksabha seat demands dayanand chorge
Varandha Ghat Road Closed : वरंधा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्याशी चर्चा करून या भिवंडी लोकसभेवर पुन्हा एखाद्या कंपनीला सांगून चार दिवसाचा सर्व्हे करावा आणि त्या सर्व्हेमध्ये जर राष्ट्रवादीला जर पोषक वातावरण असेल आणि मतदार राष्ट्रवादीकडे जर असेल तर मी त्याचा विचार करेन आणि नेत्यांनी सुद्धा सांगितले की या संदर्भात आम्ही चर्चा करतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चाेरगे म्हणाले मी आता उद्यापासून संपूर्ण भिवंडी लोकसभा माझ्या ठाणे ग्रामीण दौरा करणार आहे. उद्या संध्याकाळी पाच वाजता बदलापूर येथे बदलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व सदस्यांची बैठक घेईन. काँग्रेस संदर्भात आणि येणाऱ्या लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या संदर्भात कार्यकर्त्यांची मी चर्चा करणार असल्याचे दयानंद चोरगे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

congress should contest bhiwandi constituency loksabha seat demands dayanand chorge
Satara Constituency : साताऱ्याचा आखाडा तापला; उदयनराजेंच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सडेतोड उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com