"हे तर थेट आतंकवादी...!" आंदोलकांवर बोलताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मोठं विधान

Dharmendra Pradhan, NEET controversy : नीट परीक्षा वादावर सदाभाऊ खोत यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली. तसेच इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीवर आंदोलनाचे राजकारण केल्याचा आरोप करत सरकार दोषींवर कठोर कारवाई करेल, असे स्पष्ट केले.
NEET protest outside Parliament latest news
NEET protest outside Parliament latest newsSaam
Published On

Dharmendra Pradhan resignation latest news : नीट पेपरफुटी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. सोमवारी विद्यार्थ्यांनी जंतरमंतर ते संसद असा मार्च काढला होता. पण हे आंदोलन चिघळले गेले. पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांच्या मारहाणीत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या आंदोलनावर बोलताना भाजप आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली आहे. भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलनकर्त्यांना आंतकवाद्यांची उपमा दिली. आंतकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अजिबात घेऊ नका, असं वादग्रस्त विधान खोत यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सर्वसामान्यांकडूनही यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

देशामध्ये झालेली 'नीट' पेपरफुटी हे देशातील शांतता बिघडवण्यासाठी रचलेले एक मोठे षडयंत्र आहे. केंद्र सरकारने दोषींवर कारवाई केली असून सीबीआय (CBI) चौकशीचे आदेश दिलेले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसून त्यांनी स्वतः तात्काळ चौकशी लावली आहे; त्यामुळे त्यांचा राजीनामा अजिबात घेऊ नये, असे सदाभाऊ खोत म्हणाले. 'इंडिया' आघाडी व 'महाविकास आघाडी' या मुद्द्यावरून खोट्या अफवा पसरवून सरकारविरोधात वातावरण तयार करण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांकडून सोशल मीडिया आणि पेजेसच्या माध्यमातून आंदोलनाच्या आगीत तेल ओतण्याचे काम सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र..या रचनेत अजिबात बदल होता कामा नये.

NEET protest outside Parliament latest news
NEET पेपर लीक प्रकरणावर पीएम मोदींचं सर्वात मोठं विधान! दोषींवर होणार अशी कारवाई की... केंद्रीय मंत्र्याने दिली मोठी माहिती

केंद्र सरकारविरोधात षडयंत्र -

देशामध्ये नीट परीक्षेच्या झालेल्या पेपरफुटीमुळे जो काही गोंधळ सुरू आहे, निश्चितपणानं हे एक मोठं षडयंत्र आहे. नीट पेपरफुटीनंतर जे दोषी होते त्यांना पकडलं गेलेलं आहे, त्याशिवाय वेगवेगळ्या पद्धतीने त्याची चौकशी करत आहेत. कोणत्याही दोषीला आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका केंद्र सरकारने घेतलेली आहे, असे खोत म्हणाले.

देशामध्ये अशांतता माजवण्याचं काम मविआ करतेय -

ज्यांचा नीटच्या परीक्षेशी काही संबंध नाही असे लोक देशाच्या पंतप्रधानांचा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. मला वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा याच्याशी कुठेही संबंध नाही. त्या खात्याअंतर्गत जे प्रकरण झालं, ते प्रकरण त्यांनी लावून धरलं, चौकशीचे आदेश दिले. पण इंडिया आघाडीला, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला केंद्रातील आणि राज्यातील सरकारविरोधात अफवा पसरवणे, सरकारच्या विरोधामध्ये वातावरण तयार करणे, सातत्याने खोटं बोलत राहायचे आहे. देशामध्ये अशांतता माजवण्याचं काम राज्यामध्ये महाविकास आघाडी करत आहे.

NEET protest outside Parliament latest news
Rahul Gandhi : प्रधानांनी राजीनामा द्यावा, मोदींनी माफी मागावी; लाठीचार्जवर राहुल गांधी संतापले, म्हणाले...

आतंकवाद्यांना लोकशाहीच्या मार्गाने सरकारने उत्तर द्यावं -

दिल्लीमध्ये सध्या जे आंदोलन सुरू आहे, त्या आगीमध्ये तेल ओतायचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून मविआ करत आहेत. म्हणजे या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहेत. पण केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र... यात काहीही बदल होणार नाही. सरकारने शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊ नये. कारण या आतंकवाद्यांना लोकशाहीच्या मार्गाने निश्चितपणानं सरकारने उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं. कारण हा देश प्रगतीपथाच्या दिशेने जात आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com