Rahul Gandhi : प्रधानांनी राजीनामा द्यावा, मोदींनी माफी मागावी; लाठीचार्जवर राहुल गांधी संतापले, म्हणाले...

Rahul Gandhi On CJP Protest : दिल्लीतील NEET आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राहुल गांधी यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी जोरदार मागणी केली.
Rahul Gandhi on Modi remarks
Rahul Gandhi on Modi remarksSaam TV marathi
Published On

Rahul Gandhi Demands Dharmendra Pradhan’s Resignation : दिल्लीत NEET परीक्षा घोटाळ्याविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.(Rahul Gandhi on NEET protest lathi charge)

शांततेने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लाठीमार करणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून हा कोणताही भारतीय संस्कार नाही, अशी टीका त्यांनी केली. सोमवारी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि पंतप्रधान मोदींनी माफी मागण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली

देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेला पोखरले आहे. त्यामुळेच तरुण आपल्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी या गंभीर विषयावर काहीच बोलत नसून त्यांनी कालच्या लाठीचार्जच्या घटनेबद्दल विद्यार्थ्यांची थेट माफी मागितली पाहिजे, अशी जोरदार मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

Rahul Gandhi on Modi remarks
NEET पेपर लीक प्रकरणावर पीएम मोदींचं सर्वात मोठं विधान! दोषींवर होणार अशी कारवाई की... केंद्रीय मंत्र्याने दिली मोठी माहिती
काल जे काही घडलं, त्याबद्दल मोदीजींनी साधी माफीसुद्धा मागितली नाही. तरुण आज शिक्षण आणि परीक्षा पद्धतीविरोधात रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. संपूर्ण देशाला हे माहीत आहे की, आपल्या शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेला किडीने खोखलं करून टाकलं आहे. पंतप्रधान यावर गप्प का आहेत? त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे आणि हा सगळा प्रकार त्वरित बंद केला पाहिजे.
राहुल गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते
Rahul Gandhi on Modi remarks
NEET पेपर लीक प्रकरणावर पीएम मोदींचं सर्वात मोठं विधान! दोषींवर होणार अशी कारवाई की... केंद्रीय मंत्र्याने दिली मोठी माहिती

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही संसदेत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली, परंतु अध्यक्षांनी (Speaker) चर्चेसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. शांततेने विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून होणारा लाठीचार्ज पूर्णपणे अयोग्य आणि भारतीय संस्कृतीला धरून नाही, असे ते म्हणाले.

आज देशातील तरुणांसाठी रोजगाराचे आणि प्रगतीचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत; हा फक्त परीक्षेचा प्रश्न नसून तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. या प्रकरणी केवळ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानच नव्हे, तर गृहमंत्र्यांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली . तसेच आपण जखमी विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्ही हा मुद्दा बऱ्याच काळापासून मांडत आहोत, हा काही नवीन विषय नाही. पण खरी समस्या ही आहे की ही घटना वारंवार घडतेय आणि तरीही त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मला आठवतंय, जेव्हा मी उत्तर प्रदेशात काम करत होते, तेव्हा पेपर लीक झाल्यावर फक्त सर्वात खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक केली जायची. त्याला दोन दिवस कोठडीत ठेवायचे आणि त्यानंतर विषय तिथेच थांबायचा. मुख्य दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
प्रियंका गांधी वाड्रा, काँग्रेस खासदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com