

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये मोठा राडा
RSS आणि भाजप नेत्यांमध्ये हाणामारी
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला सुरू
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये कुत्र्याला खाऊ घालवण्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चेतन पवार आणि भाजप नेते वीरेंद्र शेडगे यांच्यात वाद झाला. दोघांमधील वाद थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. वादानंतर दोन्ही गटाच्या लोकांनी थेट पोलीस स्टेशनला घेरल्याचे दिसून आलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
टीव्ही९ वृत्तानुसार, आरएसएस नेते चेतन पवार हे भाजप नेते वीरेंद्र शेडगे यांच्या घराबाहेर भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत होते. यामुळे वीरेंद्र शेडगे यांनी घरासमोर कुत्र्यांना खाऊ घालण्यास विरोध केला. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पुढे दोन्ही नेत्यामध्ये वादानंतर हाणामारी झाली. वीरेंद शेडगे यांनी चेतन पवार यांना बेदम मारहाण केली.
हाणमारीच्या घटनेनंतर चेतन पवार यांनी पोलिसांत धाव घेतली. चेतन पवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास नकार दिला. त्यामुळे चेतन पवार यांनी संपूर्ण घटनेची माहिती आरएसएसच्या वरिष्ठ नेत्यांना दिली. त्यानंतर भडकलेल्या आरएसएस कार्यकर्त्यांनी वीरेंद्र शेडगे यांच्या कार्यालय आणि घराबाहेर जाऊन तोडफोड केली.
दोन्ही गटाचा वाद चिघळल्यानंतर पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या संख्येने जमाव जमला. त्यानंतर पोलिसांनी चेतन पवार यांची तक्रार घेत तपासाला सुरुवात केली. वीरेंद्र शेगडे यांचा काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला होता.
तत्पूर्वी, वीरेंद्र शेगडे यांच्या विरोधात पक्षाने कारवाई करावी, यासाठी भाजपच्या सुमित मिश्रा यांनी वरिष्ठांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी शेगडे यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी केली. या प्रकरणात भाजप काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल. तसेच पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.