

रत्नागिरीतील कोळंबे येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान दोन १६ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू
सौरव पवनकुमार झा आणि शुभम रमेश यादव अशी मृत मुलांची नावे आहेत.
क्रिकेट सामना संपल्यानंतर दोघे मैदानाजवळील डोहात पोहण्यासाठी गेले होते.
अमोल कलये, साम प्रतिनिधी
रत्नागिरीतील कोळंबे येथील पऱ्यामधील डोहात बुडून कल्याण-मुंबईतील दोन मुलांचा मृत्यू झालाय. सौरव पवनकुमार झा (वय १६) आणि शुभम रमेश यादव (वय १६, रा, कल्याण-मुंबई) अशी मृत मुलांची नावे आहेत. क्रिकेट स्पर्धेवेळी ही दुर्दैवी घटना घडलीय. क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या दोघांना डोहात पोहण्याचा मोह झाला. परंतु पाण्याचा अंदाज आल्यानं ते दोघे पाण्यात बुडाले.
कोळंबे येथे गेल्या तीन दिवसांपासून १६ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट सामने सुरु आहेत. यासाठी कल्याण येथील एका क्रिकेट अॅकॅडमीचे २० जणांची टीम खेळण्यासाठी आल्या होत्या. आज दुपारी या टीमचा सामना संपल्यानंतर त्यापैकी सौरभ आणि शुभम हे दोघे क्रिकेट मैदानाच्या बाजूलाच असलेल्या पऱ्यात पोहण्यासाठी गेले. मुळात हा डोह अतिशय धोकादायक आणि जंगलात आहे. या डोहात पोहण्यास बंदी आहे.परंतु त्याकडे दुर्लक्ष करून या दोन्ही मुलांना डोहामध्ये पोहण्याचा मोह आवरला नाही.
अन्य सहकाऱ्यांबरोबर ते त्या डोहाकडे गेले आणि त्यांनी त्या डोहामध्ये उडी मारली. पण ते वरती आलेच नाहीत. त्यामुळे सहकारी मुले प्रचंड घाबरली. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर स्थानिक काही लोक आले. परंतु तोवर त्या मुलांना बाहेर काढण्यास उशीर झाला होता. जेव्हा मुलांना बाहेर काढले तेव्हा त्यांच्या चेहऱ्याला जखमा असल्याचे दिसून आले.
त्यावरून ते उडी मारल्यानंतर दगडावर आदळून त्यांचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. या घटनेची माहिती पूर्णगड पोलिसांना दिल्यानंतर काही वेळेतच ते घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.