Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

RATNAGIRI TRAGEDY: राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. खोल पाण्यात बुडालेल्या पाच मुलांपैकी एका मुलीला वाचवण्यात यश आले.
Four children from the same family drown in Rajapur Ratnagiri
Four children from the same family drown in Rajapur Ratnagiri
Published On: 
Summary
  • राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे दुर्घटना

  • खाडीत मुळे आणि शिंपले काढण्यासाठी गेलेली पाच मुले खोल पाण्यात बुडाली

  • या घटनेत एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील नागार इंगळवाडी येथील एका खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू झालाय. खाडीमध्ये मुळे आणि शिंपले काढण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील पाच मुले खोल पाण्यात बु़डाली, यापैकी एका लहान मुलीला वाचवण्यात यश आलं पंरतु या घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले आई-वडिलांसोबत कालवे काढण्यासाठी गेलेली होती. जुनेद भाटकर यांच्या पत्नी हिना भाटकर या मुलांसह आज खाडीत मुळे व कालवे काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाण्यातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने पाचही मुले पाण्यात बुडाली. त्यातील एका मुलीला वाचवण्यात आले; मात्र इतर चार भावंडांचा दुर्दैवी अंत झाला.यात मोहम्मद जुनेद भाटकर , जुहेरिया जुनेद भाटकर , बुशिरा जुनेद भाटकर , माहिरा जुनेद भाटकर यांचा मृत्यू झालाय. खाडीतील पाणीचा अंदाज न आल्यानं पाच मुले खोल पाण्यात बुडाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com