रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात सासू-सुनेतील वादाने हिंसक वळण घेतले
भात पेरणीच्या कामासाठी लवकर उठवल्यामुळे वाद
सुनेने लाकडी फळीने मारहाण केल्याचा आरोप
सुनेवर गुन्हा दाखल
कुटुंब म्हटलं की, भांडण ही होतातच. मात्र या भांडणांनी रौद्र रूप धारण केले तर जीवित हानी होऊ शकते. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात रेहेळ-गावणवाडी येथे घडली आहे. सध्या भात पेरणीचा हंगाम सुरु असून कोकणातल्या वाड्यांमध्ये भात पेरणीला सुरुवात झाली आहे. अशातच सासूने सुनेला शेतातील काम करण्यासाठी सकाळी लवकर उठवले. याचाच राग मनात धरून सुनेने सासूला अमानुष मारहाण केली. तसेच शिवीगाळ देखील केली. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत सुनेविरोधात तक्रार दाखल केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात रेहेळ-गावणवाडी येथे घडली आहे. या गावात रहिवासी असलेले नाचरे कुटुंबातील सुवर्णा नाचरे (वय ७१) यांनी आपली सून मयुरी नाचरे हिला सकाळी लवकर उठून शेतातील पेरणीच्या कामात मदत करायला सांगितली.
मात्र झोपेतून उठवल्यामुळे मयुरी संतापली आणि दोघींमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्यानंतर सुनेने सासूला अपशब्द आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर रागाच्या भरात मयुरीने घरातील चुलीजवळ ठेवलेल्या लाकडी फळीने सासूवर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.