Raj Thackeray: छत्रपतींचं नाव न घेणाऱ्यांना आज रायगड कसा आठवला? राज ठाकरे यांचा रोख कोणाकडे?

Raj Thackeray Press Conference : महाराष्ट्रातील महापुरुषांना जातींमध्ये विभागून टाकलेत. मूळ प्रश्नांवरुन लक्ष दूर करण्यासाठी जातीपातीचं राजकारण केलं जातंय.असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केलीय.
Raj Thackeray
Raj Thackeray Saam Tv

(अभिजीत देशमूख)

Raj Thackeray Comment on Sharad Pawar :

महाराष्ट्रातील महापुरुष जातीमध्ये विभागून टाकलेत, आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला, असा टीका राज ठाकरे यांनी केलीय. राज ठाकरे यांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार यांना टोला लागावला. (Latest News)

शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी या चिन्हाचे अनावरणात रायगडावर करण्यात आले यावरून राज ठाकरे यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे मूळ नाव आणि घड्याळ चिन्ह मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस असं निवडणूक चिन्ह दिलं. या ऐतिहासिक चिन्हाचं शरद पवार यांनी शनिवारी (२४ फेब्रुवारी) रायगडावर जाऊन अनावरण केलं. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी टीका शरद पवार यांच्यावर टीका केली.

('साम टीव्ही' चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मी स्वत: शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना प्रश्न केला होता. तुम्ही भाषण करताना फुले, शाहू यांचे नाव घेता छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव का घेत नाहीत असा प्रश्न आपण शरद पवार यांना मुलाखतीच्या वेळी केला होता. आता त्यांना रायगड आठवला असून ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.

मूळ प्रश्नापासून लक्ष हटवण्यासाठी जातीपातीचं राजकारण केलं जातंय. महाराष्ट्रातील महापुरुष जातीमध्ये आपण विभागून टाकले आहेत. त्यामुळेच छत्रपतींचे नाव न घेणाऱ्यांना आज रायगड आठवला असल्याची टीका राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर केलीय. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं प्रत्येक ठिकाणी चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आहेत. ठाणे कल्याण भिवंडी या ठिकाणी बैठका झाल्याचं ते म्हणाले.

राज ठाकरे हे दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत काल कल्याण मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आज राज ठाकरे यांनी डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले ज्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय परिस्थितीवर सडेतोड टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांची टीका

राज ठाकरेंनी टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार यांच्यावर टीका केलीय. चाळीस वर्षानंतर का होईना शरद पवार रायगडावर गेले अजित पवार यांना या एका गोष्टीसाठी क्रेडीट द्यावं लागेल अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मागील 40 वर्षात पहिल्यांदाच शरद पवार रायगडावर गेले आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केलीय.

Raj Thackeray
Sharad Pawar At Raigad: सध्याचा काळ वैचारिक संघर्षाचा; पुन्हा जनतेचे राज्य आणू...' रायगडावरुन शरद पवारांची गर्जना!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com